(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र’ हा भारतातील नव्या एकाधिकारशाहीचा आविष्कार ! – माजी खासदार भालचंद्र मुणगेकर

प्रगतीशील साहित्य संमेलनात माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांचे अज्ञानमूलक आणि हिंदुद्वेषी वक्तव्य !

माजी खासदार भालचंद्र मुणगेकर

रत्नागिरी – ‘हिंदु राष्ट्र’ हा भारतातील नव्या एकाधिकारशाहीचा (नवफॅसिझमचा) आविष्कार आहे. एकाधिकारशाही ही लोकशाहीला घातक असून  धर्माच्या नावाने ती रूजत आहे. लोकशाही बळकट करायची असेल, तर साहित्यिकांनी वैचारिक लढा उभारला पाहिजे. नव्या एकाधिकारशाहीच्या विरोधात वैचारिकतेत साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे, असे उद्गार मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे काढले.

येथे आयोजित ‘प्रगतीशील साहित्य संमेलना’च्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी मंचावर ‘प्रगतीशील लेखक संघा’चे अध्यक्ष जी.के. ऐनापुरे, स्वागताध्यक्ष अभिजीत हेगशेट्ये आदी उपस्थित होते. या संमेलनाचे उद्घाटन कवी कुमार अम्बुज यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. मुणगेकर पुढे म्हणाले की,

१. भारतात समता, स्वातंत्र्य, बंधूता, न्याय, मैत्री, करुणा या मूल्यांवर आधारित जाती, वर्ग, लिंग, भेदविरहित, शोषणमुक्त, उदारमतवाद समाज निर्माण करायचा आहे. (असा भारत निर्माण करायचा असेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापनाच करणे आवश्यक आहे. सनातन धर्माची परंपरा हीच भारतीय राष्ट्रवादाची खरी परंपरा आहे. हिंदु राष्ट्राविषयी जाणून न घेता त्यावर शब्दच्छल करत रहाणे, हा हिंदुद्वेषच होय ! – संपादक)

२. त्यामुळे सर्वांनी या नव्या एकाधिकारशाहीच्या विरोधात वैचारिक भूमिका घेऊन खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

संपादकीय भूमिका 

हिंदु राष्ट्राला विरोध करणारे पुरो(अधो)गामी भारताचे ‘गझवा-ए-हिंद’ करण्याच्या (भारताचे इस्लामीकरण करण्याच्या) धर्मांधांच्या मनसुब्यांविषयी चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !