इस्रायल आणि हमास यांच्या युद्धातील महत्त्वाच्या घडामोडी

१. इस्रायलकडून लेझरवर आधारित नवीन संरक्षक ‘मिसाईल’ (क्षेपणास्त्र) यंत्रणेची चाचणी

क्षेपणास्त्रांचा साठा आणि ‘आर्यन डोम’ (क्षेपणास्त्र प्रक्षेपित करणारी) यंत्रणा वापरण्याला येणारा खर्च याला पर्याय म्हणून इस्रायल आता लेझरवर आधारित नवीन ‘आयर्न बीम’ क्षेपणास्त्र संरक्षक यंत्रणा वापरण्याविषयी चाचणी घेत आहे. ‘आयर्न बीम’ यंत्रणेचा लाभ, म्हणजे प्रत्येक क्षेपणास्त्र सोडतांना येणारा अल्प खर्च, अमर्यादित गोळीबार करता येणे, यंत्रणा वापरण्यास असलेला खर्च अल्प आणि अल्प मनुष्यबळ हा आहे. ‘फायबर लेझर’चा वापर करून ही यंत्रणा काम करते अन् त्यातून लेझर बीम सोडून हवेतील लक्ष्य नष्ट करता येते.

ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. हमासला पाठिंबा देणारा हिजबुल्ला आतंकवादी गट

लॅबेनॉनमधील हिजबुल्ला आतंकवादी गटाला इराणचा पाठिंबा असून इस्रायलवर मोठ्या प्रमाणात आक्रमण करून या भागातील तणाव तो वाढवत आहे. हिजबुल्ला हा इस्लामिक गट असून त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह बलवान सैन्य आहे. लॅबेनॉन, सीरिया, इराक आणि येमेन येथील संघर्षात या गटाची प्रमुख भूमिका आहे. या गटाचे पॅलेस्टेनियन गट आणि हमास यांच्याशी दृढ संबंध आहेत. लॅबेनॉनवरील हिजबुल्ला गटाचा प्रभाव हा वादग्रस्त असून या गटाचे समर्थक त्याला इस्रायलविरुद्ध संरक्षण करणारा या दृष्टीने पहात आहेत; परंतु या गटाला विरोध करणारे देशाला न्यून लेखत असल्याचा त्यांच्यावर आरोप करत आहेत. अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य राष्ट्रे हिजुबल्ला गटाला आतंकवादी संघटना मानत आहेत.

३. युरोपियन देशांच्या सुरक्षिततेच्या आव्हानांविषयी युरोपियन राष्ट्रांमध्ये चर्चा

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे झालेल्या परिणामांविषयी चर्चा करण्यासाठी युरोपियन युनियनच्या अंतर्गत मंत्र्यांची बैठक झाली. यामध्ये बेल्जियम, फ्रान्स आणि जर्मनी या देशांत झालेल्या अलीकडे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांविषयी चर्चा झाली. या बैठकीत कुराण जाळल्यानंतर २ धार्मिक गटांमध्ये तणाव निर्माण झालेल्या प्रसंगांना हाताळण्याविषयी चर्चा झाली. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात दोन्ही बाजूंकडील बरेच जण घायाळ झाले आहेत.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.