सावंतवाडी : ‘इस्कॉन’च्या सावंतवाडी विभागाच्या वतीने सावंतवाडी कारागृहातील बंदीवानांसाठी ‘श्रीमद्भगवद्गीता आत्मसाक्षात्काराचे विज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कारागृह अधीक्षक संदीप एकशिंगे यांनी, ‘अशा आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे बंदीवानांच्या जीवनात शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक परिवर्तन होऊ शकेल’, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी कारागृहाधिकारी संजय मयेकर यांनी कारागृहातील बंदीवानांसाठी हा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केल्याविषयी इस्कॉनच्या सावंतवाडी विभागाचे आभार मानले. कणकवली येथील ‘एस्.एस्.पी.एम्. इंजिनीयरिंग कॉलेज’चे प्राचार्य डॉ. महेश साटम यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले.
या वेळी इस्कॉनचे अनिरुद्ध प्रभुजी, दत्ताराम देसाई, दाऊजी बलराम, प्रवीण पवार, कुमार पाटील, प्रकाश रेडकर, कारागृहाचे सुभेदार धुमाळ, कारागृह कर्मचारी आदी उपस्थित होते.