|

नवी मुंबई – नेरूळ येथे डॉ. डी.वाय. पाटील रुग्णालयासमोर रुग्णवाहिका साहाय्यकाला चौघांनी गाडीतून खाली खेचून बाहेर काढले. त्याला बांबूने बेदम मारहाण केली. त्याच्यावर चाकूचे वार केले. यात त्याचा मृत्यू झाल्याची निश्चिती झाल्यावर त्याच्या मानेत खुपसलेला चाकू तशाच अवस्थेत टाकून आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून एका संशयितास कह्यात घेतले आहे. युवराज अंजमेंद्र सिंह असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो रुग्णवाहिकेवर साहाय्यक आणि वेळप्रसंगी चालकाचे काम करत होता. हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी एका संशयिताला कह्यात घेतले असून पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिकाकायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा ! |
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
ठाणे जिल्ह्यात पाणीटंचाई; शासन दीर्घकालीन उपाययोजना करणार ! – मेघना साकोरे-बोर्डीकर, राज्यमंत्री
राज्यात अवैध बाईक टॅक्सी चालकांचे प्रमाण मोठे : १४ मासांत १ सहस्राहून अधिकांवर कारवाई !
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री