सोलापूर, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – पाकिस्तान येथील सिंध भागातील भावसार क्षत्रिय समाजाची कुलदेवी असणार्या श्री हिंगलाजमातेचे प्राचीन मंदिर २४ नोव्हेंबर या दिवशी भुईसपाट करण्यात आले. यामुळे समस्त हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या प्रकरणी पाकिस्तान सरकारचा समस्त भावसार क्षत्रिय समाजाने जाहीर निषेध व्यक्त केला आहे. भावसार क्षत्रिय समाजाच्या वतीने खासदार जय सिद्धेश्वर महाराज यांच्या माध्यमातून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय गांभीर्यपूर्वक मांडण्यासाठी निवेदन पत्र देण्यात आले आहे.
या वेळी पूर्व विभाग भावसार क्षत्रिय समाज सोलापूर हिंगलाजमाता मंदिर समितीचे अध्यक्ष श्री. विजय महिंद्रकर, विश्वस्त श्री. नरेश पतंगे, श्री. आनंद मुसळे, श्री. प्रमोद चिंचुरे, श्री. प्रशांत हिबारे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉ. किरण देशमुख, सरचिटणीस श्री. सुनील गौडगाव, श्री. दत्तात्रय पोसा, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पासकंटी आदी मान्यवर उपस्थित होते. श्री हिंगलाज मातेचे प्राचीन मंदिर भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ होते.