सानपाडा येथे मुदत संपूनही दुकानांवर मराठीत पाट्या न लावणार्‍यांवर कारवाई करा !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई, २६ नोव्हेंबर (वार्ता.) – मुदत संपूनही सानपाडा येथे जी दुकाने आणि आस्थापने यांच्या पाट्या ठळक मराठी भाषेत नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून कारवाई केली पाहिजे ! – संपादक) सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी या प्रकरणी नार्वेकर यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्व दुकाने आणि आस्थापने यांच्यावर मराठीत नामफलक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वाढीव मुदत २५ नोव्हेंबर या दिवशी संपली आहे. अद्यापही सानपाडा येथील अनेक दुकाने आणि आस्थापने यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाही.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात मराठीसाठी संवेदनशील न रहाणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीयच होत !