१. ‘३०.८.२०२३ या दिवशी मी देवद (पनवेल) आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या गाडीला प्रदक्षिणा घालत असतांना माझा ‘निर्विचार’ हा जप चालू होता. तेव्हा ‘माझे संपूर्ण शरीर हलके झाले आहे’, असे मला वाटले. मला मागील ७ दिवसांपासून असेच वाटत होते.
२. मागील ३ मासांपासून (महिन्यांपासून) दिवसभर माझा असा भाव असायचा की, ‘मी सतत श्रीकृष्णाच्या अनुसंधानात आहे. माझे शरीर हे श्रीकृष्णाचेच शरीर असून माझ्या देहावर श्रीकृष्णासारखी वस्त्रे आणि अलंकार आहेत. माझी प्रत्येक कृती श्रीकृष्णच करत आहे. माझ्या प्रत्येक कृतीत श्रीकृष्ण आहे.’
३. आतासुद्धा माझी सतत भावावस्था असते. त्यामुळे माझ्या मनातील अन्य विचारांची गती पुष्कळ उणावली आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मी ही भावावस्था अनुभवू शकत आहे. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे आणि ‘मला सतत भगवंताच्या अनुसंधानात ठेवावे’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– श्री. अविनाश परशुराम गिरकर (वय ६९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.९.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |