Hindu Janajagruti Samiti on Halal Cancellation : ‘हलाल प्रमाणित’ उत्पादनांवर निर्बंध लादण्याची सिद्धता करणारे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन ! – हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांची नोंदणी रहित करण्याची मागणी

मुंबई – ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करून आदर्श निर्माण करणारे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षड्यंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी हिंदु जनजागृती समिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत आहे. याद्वारे देशविरोधी कारवायांना आर्थिक पाठबळ पुरवणार्‍यांवर कारवाई होऊन देशाची सुरक्षितता, कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी आशा हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी व्यक्त केली. श्री. शिंदे यांनी केंद्र सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ अर्थात ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ ही सरकारी प्रमाणन संस्था अन् प्रत्येक राज्याची ‘अन्न आणि औषधी प्रशासन’ (एफ्.डी.ए.) ही व्यवस्था अस्तित्वात असतांना धार्मिक आधारावर ‘हलाल प्रमाणिकरण’ करणार्‍या बेकायदेशीर संस्थांची नोंदणी रहित करावी, अशी मागणी या निमित्ताने केली.

श्री. रमेश शिंदे

श्री. शिंदे पुढे म्हणाले की,

१. पूर्वी केवळ मांसच ‘हलाल’ मिळत असे. आता विविध खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्य प्रसाधनांपासून ‘हाऊसिंग कॉम्प्लेक्स’, पर्यटन, व्यापारी संकुल आदी अनेक क्षेत्रांत ‘हलाल प्रमाणिकरण’ चालू झाले आहे.

२. भारतात रहाणार्‍या १४ टक्के मुसलमानांसाठी, ८६ टक्के मुसलमानेतर समाजाला (हिंदु, शीख, जैन, बौद्ध आदींना) त्यांच्या इच्छेविरुद्ध ‘हलाल प्रमाणित’ उत्पादने विकण्यात येत आहेत. हे अत्यंत गंभीर असून ही एकप्रकारे धार्मिक बळजोरी आहे.

३. हिंदु जनजागृती समिती याविषयी अनेक वर्षांपासून जनजागृती करत आहे. समितीने ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ प्रकाशित करून आणि मोठ्या प्रमाणात आंदोलने करून या समस्येला सर्वप्रथम वाचा फोडली.

४. हलाल अर्थव्यवस्थेद्वारे भारतविरोधी कारवायांना आर्थिक बळ पुरवण्याचे षड्यंत्रही समितीने उघड केले.

५. याची दखल योगी आदित्यनाथ यांनी घेतली आणि कारवाईचे सुतोवाच केले आहेत, हे अभिनंदनीय असून त्यांचे देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांनी अनुकरण करायला हवे.