बेंगळुरू (कर्नाटक) – ‘गणपति ही काल्पनिक देवता आहे, त्याची पूजा करण्याची आवश्यकता नाही’, असे वादग्रस्त विधान करणारे साणेहळ्ळी मठाचे पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांच्याविरुद्ध हिंदुत्वनिष्ठ प्रशांत संबरगी यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, गणपति हे कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत आहे. समाजाच्या एका वर्गाचे तुष्टीकरण करण्यासाठी देशातील बहुसंख्यांकांच्या श्रद्धास्थानी असलेल्या आणि शेकडो वर्षांपासून भक्ती-श्रद्धापूर्वक पूजन होत असलेल्या गणपतीविषयी अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य पंडिताराध्य शिवाचार्य स्वामी यांनी केले आहे. अशा वक्तव्याने समाजस्वास्थ्य धोक्यात येत आहे.
संपादकीय भूमिकास्वामीजींनी समाजाला सत्याचे ज्ञान देणे अपेक्षित असतांना सवंग लोकप्रियतेसाठी आणि राजकीय लाभाने प्रेरित होऊन असे विधान करणे, हे समाजात दुफळी निर्माण करण्यासारखेच होय ! अशा स्वामींविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी ! |