मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई – पुणे येथील ससून सर्वाेपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांचे १३ जानेवारीला सयुक्तिक कारणाविना स्थानांतर झाले होते. त्यांच्या जागी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती झाली होती. डॉ. काळे यांनी या विरोधात ‘मॅट’कडे (‘महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल’कडे) दाद मागितली. ‘मॅट’ने १४ जुलैला डॉ. काळे यांच्या बाजूने निकाल दिला. या विरोधात डॉ. ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने १० नोव्हेंबरला निकाल देत ‘मॅट’चा निर्णय योग्य ठरवत डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती रहित केली.
ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन डॉ. संजीव ठाकूर पदमुक्त, तर ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. प्रवीण देवकाते निलंबित https://t.co/6cLafQuNvh #lalitpatil
— ABP माझा (@abpmajhatv) November 11, 2023