भारतावर तत्सम आक्रमण करण्याचा घाट !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – हमासच्या जिहादी आतंकवादी ७ ऑक्टोबर या दिवशी इस्रायली नागरिकांना ठार मारत असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले. पाकिस्तानातील ‘लष्कर-ए-तोयबा’ ही आतंकवादी संघटना हे व्हिडिओ तिच्या आतंकवाद्यांना दाखवत असून भारतावरही अशा प्रकारे आक्रमण करणार असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांना याची माहिती मिळाली आहे. यावरून केंद्रीय गृहमंत्रालयाने सैन्याला सर्व कार्यपद्धतींचे काटेकोरपणे पालन करण्याचा आदेश दिला असून अत्यंत सतर्क रहाण्यास सांगितले आहे. यासमवेतच सीमेवरून उडणार्या प्रत्येक वस्तूवर गोळीबार करण्याचाही आदेश दिला आहे. सीमावर्ती भागात रडार, तसेच ड्रोन यांद्वारे पाळत ठेवली जात आहे.
इस्रायलवर आक्रमण करण्यासाठी २ सहस्र आतंकवादी ‘मोटार ग्लायडर’ आणि ‘हँड ग्लायडर’ यांचा वापर करून इस्रायली भूमीत घुसले होते. भारतावर आक्रमण करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाने अशा प्रकारची अवजड ड्रोन खरेदी केली आहेत. ही ड्रोन्स एका व्यक्तीला घेऊन उडू शकतात. त्यामुळे यांना ‘मॅन लिफ्टिंग ड्रोन’ असे संबोधले जाते. गुजरात, राजस्थान, काश्मीर आणि पंजाब या राज्यांमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ हमाससारखे आक्रमण करू शकते, अशी भीती आहे.
संपादकीय भूमिकापॅलेस्टाईन आणि पर्यायाने हमासचे समर्थन करणारे भारतातील नागरिक या संभाव्य आक्रमणांत सहभागी झाले, तर आश्चर्य वाटू नये ! |