लातूर – वर्ष २०१६ मध्ये मिरज येथून रेल्वेने पाणी आणून लातूरकरांची तहान भागवावी लागली होती. यावर्षीही पर्जन्यमान अत्यल्प झाले आहे. त्यामुळे पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याची वेळ येऊ नये, यासाठी जनजागृती करण्यासाठी ‘वसुंधरा प्रतिष्ठान’ने लातूरच्या क्रीडा संकुलावरील झाडांना फलक लावले आहेत. त्यावर ‘पाण्याचा जपून वापर करा’, असे आवाहन करण्यात आले आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणार्या मांजरा धरणातही पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे दिवाळीनंतर लातूर महानगरपालिकेने सप्ताहातून १ वेळेस नळाला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.