उत्तरप्रदेशातील ‘अलीगड’चे नाव ‘हरिगड’ करण्याचा प्रस्ताव नगरपालिकेत संमत !

शासनाकडे अनुमतीसाठी पाठवणार !

अलीगड (उत्तरप्रदेश) – ‘अलीगड’चे नाव पालटून ‘हरिगड’ करण्याचा प्रस्ताव येथील नगरपालिकेमध्ये संमत करण्यात आला. भाजपचे नगरसेवक संजय पंडित यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

आता हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात येणार आहे. शासनाने संमत केल्यावर अधिकृतरित्या नावात पालट केला जाणार आहे.