मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील सोनपूरमधील अजमत नगर चौपडा भागातील प्राचीन शिवमंदिरातील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करून तेथे लघवी करण्यासह विष्ठा टाकल्याचे समार आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. गावाचे सरपंच शाखवत हुसेन यांनी सांगितले की, ही घटना समाजकंटकांनी केली आहे.
मंदिराची राखण करणारे भूरेलाल यांनी सांगितले की, घटना रात्रीच्या वेळी घडली. त्या वेळी मी झोपलो होतो. सकाळी मी पाहिले, तर मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती, तसेच तेथे लघवी करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही. हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणारे, हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर आक्रमण करणारे,तसेच देवतांचे विविध माध्यमांतून विडंबन करणारे यांना आता फाशीचीच शिक्षा करणारा कायदा करणे आवश्यक आहे ! |