ख्रिस्ती महिलांच्या विरोधात तक्रार

जुने गोवे : चिंबल येथील एका कुटुंबाला पैशांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या २ ख्रिस्ती महिलांच्या विरोधात या कुटुंबाने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे. यातील एक ख्रिस्ती महिला ही ताळगाव येथील, तर दुसरी महिला मिझोराम येथील आहे.
हिंदु कुटुंबाने आमीष दाखवून होत असलेल्या धर्मांतराच्या प्रकाराविषयी येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना रंगेहात पकडले; परंतु या वेळी एक महिला पळून गेली, तर दुसर्या महिलेला जुने गोवे पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाख्रिस्ती महिलांकडून गोव्यात घरोघरी हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार घडत आहेत. आमिषे दाखवून हिंदूंच्या धर्मांतराच्या होत असलेल्या प्रकारांविषयी हिंदूंनी सतर्क रहाणे आवश्यक ! |
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
सत्र न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रहित !
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !