ताप आलेला असतांना पचायला जड असे पदार्थ खाणे टाळावे

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २४७

‘सध्‍या अनेक ठिकाणी तापाची साथ चालू आहे. तापामध्‍ये शरिराची पचनशक्‍ती क्षीण झालेली असते. गव्‍हाची पोळी, मैद्याचा पाव किंवा बिस्‍कीट, दूध आणि दुधाचे पदार्थ, उडदाच्‍या डाळीचे पदार्थ, कंदमुळे, मांस हे पदार्थ पचायला जड असतात. त्‍यामुळे ताप आलेला असतांना हे पदार्थ खाऊ नयेत.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्‍यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan