ठाणे, ३ नोव्हेंबर (वार्ता.) – कळवा-विटावा येथील सूर्यानगर परिसरात असलेल्या १ मजली इमारतीचा स्लॅब २ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजताच्या सुमारास कोसळला. या घटनेत चंद्रिका जनार्दन (वय ३३ वर्षे) हिचा मृत्यू झाला आहे, तर लीलावती कुंजू (वय ६५ वर्षे) ही महिला घायाळ झाली आहे. २३ वर्षे जुने बांधकाम असलेल्या त्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून इमारत धोकादायक स्थितीत आहे. ही इमारत तात्काळ रिकामी करण्याची महानगरपालिकेने संबंधितांना नोटीस बजावली असून या रहिवाशांची अन्य ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.