उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. अन्वी अमोल वानखडे ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०२० मध्ये ‘चि. अन्वी अमोल वानखडे महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
आश्विन कृष्ण प्रतिपदा (२९.१०.२०२३) या दिवशी चि. अन्वी अमोल वानखडे हिचा चौथा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे आई-वडील, आजी आणि साधिका यांना लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. सौ. आनंदी वानखडे (अन्वीची आई), अमरावती
१ अ. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी गेल्यावर जाणवलेली सूत्रे
१ अ १. आई शिबिराला गेली असतांना आजीसह निवासस्थानी रहाणे : ‘वर्ष २०२३ मध्ये आम्ही (मी, माझे यजमान अमोल अन् अन्वी) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी गेलो होतो. अन्वीला सांभाळण्यासाठी माझी आई (सौ. महानंदा चोरे) समवेत आली होती. त्या वेळी मी दिवसभर शिबिरात असे आणि अन्वी तिच्या आजीच्या समवेत निवासस्थानी रहात असे.
१ अ २. आईला यायला उशीर झाल्यासही गार्हाणे न करणे : शिबिर संपल्यावर मला रात्री खोलीत यायला उशीर होत होता. तेव्हा अन्वी झोपलेली असे. दुसर्या दिवशी ती सकाळी उठण्याच्या आधीच मी शिबिराच्या ठिकाणी जात होते; मात्र तिने याविषयी कधीच गार्हाणे केले नाही.
१ अ ३. आश्रमजीवनाशी एकरूप होणे : ती स्वतःहून साधकांकडे जात असे. ती साधकांच्या समवेत मिळून-मिसळून रहात होती. ती बालसाधकांशी खेळत असे. ‘ती आश्रमजीवनाशी एकरूप झाली आहे’, असे आम्हाला जाणवले. ‘देवाने तिच्या चित्तावर आधीपासूनच आश्रमात रहाण्याचा संस्कार केला आहे’, असे मला वाटते.
१ आ. माझ्याकडून एखादी चूक झाली किंवा अयोग्य कृती घडत असेल, तर ती लगेच मला चूक लक्षात आणून देते.
१ इ. भाव
१. तिच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव आहेे. ती गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पहात पुष्कळ वेळ बोलत असते. ती अधून मधून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाकडे पहात असते.
२. ती सांगते, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ याच माझी आई आहेत.’’
‘देवाने आम्हाला अन्वीमुळेच आश्रमात राहून सेवा करण्याची संधी दिली’, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. ‘देवाने आम्हाला निरंतर त्याच्या चरणांशी ठेवावे’, अशी मी प्रार्थना करते.’
२. श्री. अमोल वानखडे (अन्वीचे वडील), अमरावती
२ अ. आनंदी : ‘अन्वी नेहमी आनंदी असते. सेवाकेंद्रात साधक आले की, तिला फार आनंद होतो. अन्वीला सगळ्यांच्या समवेत रहायला आवडते.
२ आ. प्रेमळ : मला किंवा सेवाकेंद्रातील साधकांना शारीरिक त्रास होत असल्यास अन्वीला वाईट वाटतेे आणि ती लगेच संबंधितांची प्रेमाने विचारपूस करते.
२ इ. स्वीकारण्याची वृत्ती
१. मला सेवेला जायचे असले, तरी ती आनंदी असते. ती प्रत्येक परिस्थितीशी लवकर जुळवून घेते.
२. एकदा आम्हाला एका ठिकाणी प्रवचनाच्या सेवेसाठी जायचे होते. तेथे आम्हाला ३ – ४ घंटे लागणार होते; म्हणून आम्ही अन्वीला एका साधिकेच्या घरी नेले. ‘आम्हाला घरी यायला वेळ लागेल’, असे मी अन्वीला समजावून सांगितले. तेव्हा अन्वी त्या साधिकेकडे रहायला सहजतेने सिद्ध झाली.
३. वर्ष २०२३ च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ती दिवसभर एका धर्मप्रेमी दादांच्या घरी त्यांच्या मुलांच्या समवेत राहिली. तेव्हा तिने कुठलेही गार्हाणे किंवा हट्ट केला नाही. त्यामुळे मी सेवा करू शकलो.
४. अन्वीने एखादी वस्तू मागितल्यास ‘ती महाग आहे. आता तुला याचा काही उपयोग होणार नाही. पुढे पाहू’, असे तिला सांगितल्यास ती लगेच ऐकते.
२ ई. प्रसंगात न अडकणे : मी तिला एखाद्या प्रसंगात रागावलो किंवा शिक्षा केली, तरी ती फार वेळ वाईट वाटून घेत नाही. ती लगेच क्षमा मागते आणि प्रसंगातून बाहेर पडते.’
३. सौ. महानंदा चोरे
(अन्वीची आजी – आईची आई), अमरावती
‘जून २०२३ मध्ये मला अन्वीला सांभाळण्यासाठी रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला अन्वीची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
३ अ. कुणामध्येही न अडकणे : अन्वी तिच्या आईविना माझ्या समवेत दिवसभर रहात असे. याआधी ती तिच्या आईविना माझ्या समवेत राहिली नव्हती. तिची आई सकाळी लवकर शिबिराला जायची. अन्वी कधीतरी आईविषयी विचारायची; पण नंतर लगेच खेळायला लागायची. ती दिवसभर आईची आठवणही काढत नव्हती. तेव्हा ‘ती कुणामध्येेही अडकत नाही’, असे माझ्या लक्षात आले.
३ आ. समंजस : अन्वीला जेवण भरवतांना किंवा अंघोळ घालतांना तिने मला जराही त्रास दिला नाही. एकदा मी तिची वेणी घालत असतांना तिला सांगितले, ‘‘मला तुझ्या आईसारखी वेणी घालता येणार नाही हं.’’ तेव्हा ती एकदम शांत उभी राहिली आणि माझ्या गालावर हात फिरवू लागली.
३ इ. प्रेमळ : तिला जेवण किंवा अल्पाहार दिल्यावर ती म्हणायची, ‘‘आजी, तूही घे ना. माझ्यासह जेव ना.’’
३ ई. सहनशील : अन्वी पुष्कळ सहनशील आहे. शिबिराच्या शेवटच्या दिवशी तिला ताप आला होता. मला क्षणभर वाटले, ‘तिच्या आईला बोलावून घ्यावे’; मात्र तिने मला दिवसभर कसलाही त्रास दिला नाही. ती शांत होती.
३ उ. अन्वीच्या बोलण्यात पुष्कळ गोडवा आहे. मला तिचे बोलणे ‘ऐकतच रहावे’, असे वाटते. तिचे निखळ हसणे माझ्या मनाला फार उभारी देते.
३ ऊ. आध्यात्मिक दृष्टीकोन देणे : एकदा मी तिला म्हणाले, ‘‘माझ्या मनात पुष्कळ विचार येतात. त्यांचा मला फार त्रास होतो. मी काय करू ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘तू सतत नामजप कर आणि परात्पर गुरु डॉक्टरांना हे सर्व सांग.’’ तिचे बोलणे ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. एवढ्या लहान वयात तिचे आध्यात्मिक दृष्टीकोन आणि प्रगल्भता अनुभवत असतांना मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला या सेवेतून शिकता आले आणि आनंद मिळाला’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
४. कु. श्रुती शिरसाठ (संभाजीनगर येथील साधिका)
४ अ. प्रेमभाव : ‘आम्ही धर्मप्रचाराच्या सेवेला गेल्यावर अन्वी तिच्या आईच्या समवेत सेवाकेंद्रात रहात असे. आम्ही सेवा करून आल्यावर ती दार उघडून आमची विचारपूस करत असे.
४ आ. अन्वीशी बोलल्यावर मन सकारात्मक होणे : माझ्या मनाची स्थिती नकारात्मक असतांना मी अन्वीशी बोलल्यावर आणि तिचा आवाज ऐकल्यावर माझे मन सकारात्मक होते.
४ इ. अन्वीची आई प्रसंगात अन्वीला साधनेचे दृष्टीकोन सांगते. एखाद्या साधकाच्या संदर्भात तसाच प्रसंग घडल्यास अन्वी संबंधित साधकाला आठवणीने तिच्या आईने सांगितलेला दृष्टीकोन सांगते.’
५. अन्वीचे स्वभावदोष : ‘राग येणे आणि मनाविरुद्ध झाल्यास चिडचिड करणे – सौ. आनंदी अमोल वानखडे