व्‍यष्‍टी आणि समष्‍टी साधना तळमळीने करणार्‍या देवद आश्रमातील कु. सुषमा लांडे (वय ३९ वर्षे) !

आश्विन शुक्‍ल त्रयोदशी (२७.१०.२०२३) या दिवशी देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. सुषमा लांडे यांचा ३९ वा वाढदिवस आहे. त्‍या निमित्ताने देवद आश्रमातील कु. दीपाली माळी यांना त्‍यांची जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथेे दिली आहेत.

कु. सुषमा लांडे

कु. सुषमा लांडे यांना ३९ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

१. नियोजन कौशल्‍य

‘साधकांची साधना व्‍हावी आणि त्‍यांचा सेवेतील वेळ वाया जाऊ नये’, यासाठी  कु. सुषमाताई साधकांच्‍या सेवांचे नियोजन उत्तमरित्‍या करते. सेवेसाठी साधकसंख्‍या अल्‍प असतांनाही ती सेवांचे उत्तम नियोजन करते. त्‍यामुळे सेवा अधिक असतांनाही साधकांना त्‍याचा ताण येत नाही.

२. तत्त्वनिष्‍ठता

तत्त्वनिष्‍ठता हा सुषमाताईचा सर्वांत चांगला गुण आहे. एखादा साधक वेळ वाया घालवत असेल, तर सुषमाताई  लगेच त्‍याला त्‍याच्‍या चुकीची जाणीव करून देते. त्‍या वेळी ‘त्‍याने त्‍याच्‍या क्षमतेचा पूर्ण वापर करून सेवा करायला हवी’, हा ताईचा उद्देश असतो.

कु. दीपाली माळी

३. सेवेतील कार्यपद्धतीची घडी बसवण्‍याचा प्रयत्न करणे

ताई सेवेतील कार्यपद्धतीची घडी बसवण्‍यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. त्‍यासाठी साधकांकडून अल्‍प प्रयत्न होत असल्‍यास ताई त्‍यांना त्‍याची स्‍पष्‍टपणे जाणीव करून देते. साधकांना चिंतन करण्‍याची सवय लागावी, यासाठी ती साधकांना सेवेतील बारकावे लक्षात घेऊन सेवा करण्‍यास सांगते. त्‍यामुळे साधकांचा उत्‍साह वाढून परिपूर्ण सेवा करण्‍याच्‍या दृष्‍टीने त्‍यांचे प्रयत्न वाढू लागले.

४. तीव्र शारीरिक त्रास असूनही सतत सेवारत रहाणे

सुषमाताईच्‍या मणक्‍यामधील ‘गॅप’ न्‍यून झाल्‍यामुळे तिला त्‍याचा पुष्‍कळ त्रास होत होता. त्‍यामुळे काही दिवसांपूर्वी तिला पनवेल येथील एका रुग्‍णालयात भरती करावे लागले होते. ती साधारण ७ – ८ दिवस तेथे होती. तेथे राहून ताई साधकांच्‍या सेवांचे नियोजन करायची.  रुग्‍णालयात असूनही तिच्‍या मनात सेवेचेच विचार असायचे. तिने तेथून लहानसहान सेवांचेही नियोजन उत्तमरित्‍या केले.

५. उत्तरदायी साधक असूनही तिला तिच्‍या अनुभवाचा काहीच अहं नाही.

६. स्‍वतः शिकण्‍याच्‍या स्‍थितीत राहून अन्‍य साधकांना सेवा शिकवणे

सुषमाताई उत्तम चविष्‍ट स्‍वयंपाक बनवते. तिच्‍याप्रमाणे इतर साधकांनाही तो करता यावा, यासाठी ती त्‍यांना सिद्ध (तयार) करते. त्‍या वेळी तिही शिकण्‍याच्‍या स्‍थितीत असते. त्‍या वेळी एखादी नवीन गोष्‍ट तिच्‍या लक्षात आली की, ती लगेच ती गोष्‍ट इतरांना सांगते.

७. साधकांना समजून घेणे

पूर्वी सुषमाताईच्‍या साधकांकडून पुष्‍कळ अपेक्षा होत्‍या. अपेक्षांमुळे तिची काही वेळेला चिडचिडही होत असे; परंतु आता ती चिडचिड न करता शांतपणे परिस्‍थिती हाताळते. तिने साधकांना समजून घेण्‍यासाठी प्रयत्न वाढवले आहेत.

८. व्‍यष्‍टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करणे

पाठीचा त्रास वाढल्‍यामुळे ताई काही मासांपूर्वी चिपळूण येथे उपचारांसाठी गेली होती. तेथे ती १५ दिवस होती. तेथील वास्‍तव्‍यात असतांना ताईने व्‍यष्‍टी साधनेचे चांगले प्रयत्न केले. ती तेथे सारणी लिखाण आणि स्‍वयंसूचना सत्रेही नियमित करायची.

‘हे गुरुमाऊली (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), केवळ आपल्‍या कृपेमुळे आम्‍हाला अशा गुणी ताईचा सहवास लाभत आहे. यासाठी मी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– गुुरुदेवांची,

कु. दीपाली राजेंद्र माळी (वय २३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२१.१.२०२३)