DashMahavidya Yaag : नवरात्रीत सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पार पडले ‘दशमहाविद्या याग’!

‘दशमहाविद्या यागा’च्‍या ठिकाणी मांडणी करण्‍यात आलेली पूजा
छायाचित्रात डावीकडून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आणि पूर्णाहुती देतांना सनातन पुरोहित पाठशाळेचे श्री. सिद्धेश करंदीकर

रामनाथी (फोंडा, गोवा) – नवरात्रोत्‍सवानिमित्त येथील सनातन संस्‍थेच्‍या आश्रमात १५ ते २४ ऑक्‍टोबर २०२३ या कालावधीमध्‍ये ‘दशमहाविद्या याग’ पार पडले. ‘सनातन धर्माची संस्‍थापना लवकरात लवकर व्‍हावी, सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्‍यूयोग टळून त्‍यांना आरोग्‍यपूर्ण दीर्घायुष्‍य लाभावे आणि साधकांच्‍या आध्‍यात्मिक त्रासांचे निवारण व्‍हावे’, या उद्देशाने हे याग झाले. या यागात करुंगाळी चूर्ण आणि मूलिका चूर्ण यांचे हवन करण्‍यात आले. या यागाला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या आध्‍यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्‍थिती लाभली. या यागानंतर प्रतिदिन गायन सेवा सादर करण्‍यासाठी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे साधक आणि साधिका यांना आमंत्रित करण्‍यात आले होते. त्‍यानुसार विश्‍वविद्यालयाचे साधक आणि साधिका यांनी देवीची आरती, भक्‍तीगीते आणि भारूड आदी विविध प्रकारातील गायनसेवा सादर केली.