बस्ती (उत्तरप्रदेश) येथील नवरात्रोत्सव मंडपात मुसलमान तरुणीने देवीच्या मूर्तीवर फेकले काळे कापड !

  • ‘इस्लाम झिंदाबाद’ आणि ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा दिल्या घोषणा !

  • तरुणीला अटक करण्याची हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

बस्ती (उत्तरप्रदेश) – येथील चौरी बाजारामध्ये सिंहवाहिनी दुर्गापूजा समितीने आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाच्या वेळी भजन चालू होते. त्या वेळी एका मुसलमान तरुणीने श्री दुर्गादेवीची मूर्ती आणि भजन करणारे गायक यांच्यावर काळे कापड फेकले. या तरुणीने गायकाकडून ध्वनीक्षेपक खेचण्याचा प्रयत्न करत ‘इस्लाम झिंदाबाद’ ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. ही घटना रात्री २ च्या सुमारास घडली. याची माहिती दुसर्‍या दिवशी सकाळी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांना मिळाल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी येथील महामार्गावर निदर्शने करत तरुणीला अटक करण्याची मागणी केली. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. यात एक जण घायाळ झाला. पोलिसांनी तरुणीला अटक करण्याचे आश्‍वासन दिले.

 (सौजन्य : Vidrohi ANAND)

संपादकीय भूमिका

नवरात्रोत्सवात मोठ्या संख्येने हिंदू उपस्थित असतांना धर्मांध तरुणी असे दुःसाहस करते, हे हिंदूंना लज्जास्पद ! धर्महानी रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या अशा मृतवत् हिंदूंवर जिहादी आतंकवाद्यांनी आक्रमण केले, तर आश्‍चर्य ते काय ?