दुर्गामाता दौडच्या माध्यमातून युवा हिंदूंचे मोठ्या प्रमाणात संघटन होत आहे ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

सातारा येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची श्री दुर्गामाता दौड !

दौडीच्या समारोपाच्या वेळी मार्गदर्शन ऐकतांना उपस्थित धारकरी

सातारा, २४ ऑक्टोबर (वार्ता.) – शिवनेरी ते पुरंदर आणि प्रतापगड ते दुर्गराज रायगड या संपूर्ण परिसरात भगवे वातावरण निर्माण झाले आहे. श्री दुर्गामाता दौडच्या माध्यमातून युवकांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने पाऊल टाकले आहे. या माध्यमातून युवा हिंदूंचे मोठ्या प्रमाणात संघटन होत आहे. हे युवक क्रांती केल्याविना रहाणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी केले. नागठाणे (सातारा) येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून श्री दुर्गामाता महादौडचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नागठाणे आणि पंचक्रोशीतील २ सहस्रांहून अधिक धारकरी या महादौडमध्ये सहभागी झाले होते.

श्री. सुनील घनवट पुढे म्हणाले, ‘‘उदयनिधी स्टॅलीन आणि इतर अर्बन नक्षलवादी यांनी जी वक्तव्ये केली आहेत, ती निश्चितच निषेधार्ह आहेत. त्यांनी सनातन धर्मियांचा अंत पाहू नये. ठिकठिकाणी इतिहासाविषयी व्याख्याने घेऊन पुरोगामी युवकांचा बुद्धीभेद करत आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कसे ‘सर्वधर्मसमभावी’ होते ? हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

क्षणचित्रे

१. दुर्गादौडच्या वेळी युवकांनी हमास आणि पॅलेस्टाईनचे ध्वज पायाखाली घेऊन दौड केली.

२. दौडीची सांगता हिंदु राष्ट्र स्थापनेच्या प्रतिज्ञेने करण्यात आली.