‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्वनीचित्रीकरणाच्या सेवेशी संबंधित साधक, म्हणजे गुणांची खाणच आहे’, याची प्रचीती घेणारे श्री. सत्यकाम कणगलेकर !

‘वर्ष २०१९ मध्ये माझ्या शारीरिक त्रासांचे प्रमाण वाढल्यामुळे मला सेवेसाठी प्रवास करणे अशक्य झाले. त्यामुळे मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करू लागलो. तेव्हापासून मी ध्वनीचित्रीकरणाच्या संदर्भात सेवा करत आहे. या कालावधीत मला या सेवेचे स्वरूप आणि सहसाधकांची गुणवैशिष्ट्ये शिकायला मिळाली. ती पुढे दिली आहेत. २०.१०.२०२३ या दिवशी आपण काही गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज पुढील भाग पाहूया.

श्री. सत्यकाम कणगलेकर
श्री. साहील महापदी

२ ग. शिकण्याची वृत्ती आणि नम्रता असलेले श्री. साहील महापदी ! : श्री. साहील चित्रीकरणाच्या सेवेत नवीन आहेत; परंतु त्यांच्यातील शिकण्याची वृत्ती आणि नम्रता या गुणांच्या आधारावर त्यांनी चित्रीकरणाविषयी अनेक सेवा अल्प कालावधीत शिकून घेतल्या आहेत. एकदा साधकांसाठी छायाचित्रकाविषयी (कॅमेर्‍यासंबंधी) प्रशिक्षणवर्ग चालू असतांना त्यांनी त्यातील सूत्रे आत्मसात केली आणि पुढील २ – ३ दिवसांतच वर्गात शिकवलेल्या सूत्रांचे एक ‘मॅन्युअल’ (अभ्यास पुस्तिका) तयार केले.

श्री. अनिमिष नाफडे

२ घ. चिकाटी आणि चांगली स्मरणशक्ती असलेले श्री. अनिमिष नाफडे ! : श्री. अनिमिष यांच्यात चिकाटी आणि चांगली स्मरणशक्ती आहे. एका सेवेसाठी त्यांना दिवसातील १४ ते १८ घंटे एकाच ठिकाणी बसून सेवा करणे क्रमप्राप्त होते; मात्र गुरुकृपेच्या बळावर त्यांनी ते साध्य केले. गुरुकृपेने त्यांना लाभलेली चिकाटी आणि चांगली स्मरणशक्ती त्यांनी गुरुकार्यासाठी अर्पण केली. त्यामुळे ‘त्यांना निश्चितच गुरुकृपा लाभली आहे’, असे मला वाटते.

श्री. अनिरुद्ध राजंदेकर

२ च. साधकांना सेवेच्या पुढच्या टप्प्यात नेता येण्यासाठी धडपडणारे ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकर ! : श्री. अनिरुद्ध यांच्यात गुरुदेवांप्रती अपार भाव आहे. ते पूर्णवेळ सेवा करत नसले, तरी त्यांना ‘त्यांच्या कामांतून अधिकाधिक वेळ सेवेसाठी कसा देता येईल ?’, याचा ध्यास असतो. त्यांच्या कामांची व्याप्ती पुष्कळ मोठी असूनही ते आश्रमातील सेवा करण्यास सदैव तत्पर असतात. ‘साधकांना सेवेच्या पुढच्या टप्प्यात कसे नेता येईल ?’, यासाठी त्यांची धडपड नेहमी चालू असते.

‘वरील साधकांच्या समवेत ठेवून गुरुदेवांनी मला गुणांच्या खाणीतच ठेवले आहे’, असे मला वाटले. सहसाधकांचे गुण लक्षात आणून देऊन त्यांच्या समवेत सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘गुणांचा विकास करण्यासाठी सतत सतर्क ठेवून ते आत्मसात् करण्यासाठीचे प्रयत्न माझ्याकडून करून घ्या आणि माझ्यावर सदैव कृपादृष्टी ठेवा’, अशी श्री गुरुदेवांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे !’(समाप्त)

– श्री. सत्यकाम कणगलेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.१०.२०२१)     

‘श्री. सत्यकाम कणगलेकर यांनी ध्वनीचित्रीकरण सेवेतील साधकांसंदर्भात जी माहिती दिली आहे, तिच्यावरून मला साधकांसंदर्भात ‘ते किती वैशिष्ट्यपूर्ण आहेत,’ ही माहिती ज्ञात झाली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले