श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यावर शिवमोग्गा शहरात ३० दिवसांसाठी प्रवेश बंदी !

श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक

शिवमोग्गा (कर्नाटक) – शहरातील दंगल पीडित क्षेत्र असलेले रागिगुड्ड येथे श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांना भेट देण्यास प्रतिबंध लादण्यात आला आहे. पुढील ३० दिवस मुतालिक यांच्यावर एकूणच शिवमोग्गा शहराला भेट देता येणार नाही. १७ ऑक्टोबरच्या रात्री मुतालिक शिवमोग्गाच्या दिशेने जात असतांनाच त्यांना अडवण्यात आले. शहरात जाण्यावर निर्बंध घालण्यात आल्याची लिखित प्रत या वेळी त्यांना देण्यात आली. दंगलग्रस्त भागाला भेट देऊन मुतालिक भडकावणारे भाषण करतील, या संशयामुळे दक्षतेची कारवाई म्हणून निर्बंध घालण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. एकूणच रागिगुड्ड येथे १४४ कलम लावण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • कर्नाटकातील हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारचा निषेध !
  • प्रमोद मुतालिक यांना गेली अनेक वर्षे गोवा राज्यात येण्यावर बंदी आहे. काँग्रेस हिंदुत्वनिष्ठांना हिंदूंच्या देशातच एका भागातून दुसर्‍या भागात जाऊ दिले जात नाही, हे प्रभावी हिंदूसंघटनाच्या अभावाचेच फलित होय !