कात्रज येथे सक्तवसुली संचालनालयाची कारवाई !

गुंतवणुकीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक !

पुणे – बनावट आस्थापन स्थापन करून गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून राज्यातील गुंतवणूकदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कात्रज भागात मोठी कारवाई केली. या प्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तसेच पसार आरोपींचा शोधही घेण्यात येत आहे. गुंतवणूकदारांना प्रोत्साहित केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमीष आरोपींनी मध्यस्थींना दाखवले होते. गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन आरोपी पसार झाले. ईडीच्या पथकाने कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील आस्थापनाच्या कार्यालयावर धाड घातली.