कर्नाटकमधील हिंदुत्वनिष्ठ चक्रवर्ती सुलिबेले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !

  • कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध कथित अपमानास्पद विधान केल्याचा ठपका

  • कुणीही तक्रार केली नसतांना पोलिसांनी स्वतः केला गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ श्री. चक्रवर्ती सुलिबेले

कारवार (कर्नाटक) – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध कथित अपमानास्पद विधान केल्यावरून कारवार ग्रामीण ठाण्यात हिंदुत्वनिष्ठ श्री. चक्रवर्ती सुलिबेले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. ‘सिद्धरामय्या सत्तेत आल्यापासून हिंदूंना जगणे कठीण झाले आहे. मुसलमानांवर सिद्धरामय्या यांचा अभयहस्त आहे’, अशी टीका चक्रवर्ती सुलिबेले यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे नेते यांच्यावर केली होती. ते ‘जनगणमन अभियाना’च्या अंतर्गत कारवार येथील कडवाड येथे आले असतांना त्यांनी हे विधान केले होते. पोलिसांनी कुणाकडून तक्रार आली नसतांना स्वतःहून सुलिबेले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.

संपादकीय भूमिका

  • एरव्ही ‘तक्रार आल्याखेरीज कारवाई करणार नाही’, असे म्हणणारे पोलीस काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात कुणी लोकशाही मार्गाने विधान केल्यावर स्वतःहून गुन्हा नोंदवतात, हे लक्षात घ्या !