श्राद्धकर्त्‍याच्‍या किती कुळांना गती मिळते ?

महालयश्राद्ध

माता पिता च भार्या च भगिनी दुहिता तथा ।
पितृमातृष्‍वसा चैव सप्‍त गोत्राणि वै विदुः ॥

अर्थ : आई, वडील, पत्नी, बहीण, कन्‍या, आत्‍या आणि मावशी ही ७ गोत्रे आहेत. (या ७ गोत्रांतील १०१ कुळांना श्राद्ध केल्‍याने गती मिळते.)

कोणत्‍या गोत्रातील किती कुळांना गती मिळते ?

श्राद्धामुळे जरी १०१ कुळांना गती मिळत असली, तरी श्राद्धातील फल १०१ कुळांपैकी वडिलांच्‍या पूर्वीचे ११ आणि पुढचे १२ या कुळांना वाटून मिळते.

एकूणच यातून श्राद्ध केल्‍याच्‍या लाभांची अद्वितीय व्‍याप्‍ती लक्षात येते. त्‍यामुळे हिंदूंनी धर्मशास्‍त्रावर श्रद्धा बाळगून श्राद्ध करावे, तसेच साधना करून आनंदी जीवन जगावे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्‍त्रीय विवेचन’)