सोफिया (बल्गेरिया) – महान भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांनी सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील अल् कायदा या आतंकवादी संघटनेने ९/११ चे केलेले आक्रमण, इस्लामिक स्टेटचा उदय यांसह अनेक भाकिते केली होती, जी तंतोतंत खरी ठरली. बाबा वेंगा यांनी ‘जगाच्या अंत कसा होणार ?’, यांसह युद्ध आणि आपत्ती यांविषयी भाकिते केली आहेत. बाबा वेंगा यांनी वर्ष २०२३ या वर्षासाठी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, ज्या खूप भीतीदायक आहेत. यांतील अनेक गोष्टी आतापर्यंत खर्या ठरल्या आहेत. ‘इस्रायल-हमास युद्धानंतर तिसरे महायुद्ध चालू होणार’, असे भाकीत बाबा वेंगा यांनी काही वर्षांपूर्वीच केले होते. त्या असेही म्हणाल्या होत्या की, जगात अण्वस्त्रांद्वारे आक्रमणही होऊ शकते, ज्यामुळे पृथ्वीवर विद्ध्वंस होऊ शकतो.
भविष्यवेत्त्या बाबा वेंगा कोण होत्या ?
बाबा वेंगा यांचे नाव वांगेलिया पांडेवा गुश्तारोवा होते. त्या बल्गेरियातील रहिवासी होत्या. बाबा वेंगा यांचा जन्म वर्ष १९११ मध्ये झाला होता. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. ११ ऑगस्ट १९९६ या दिवशी वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी ५ सहस्र ७९ भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यांतील बहुतांश खर्या ठरल्या आहेत.