इजिप्तच्या गुप्तचर अधिकार्याचा दावा !
कैरो (इजिप्त) – आम्ही इस्रायलला युद्धाच्या संदर्भात इशारा दिला होता, असा दावा इजिप्तने केला आहे. इजिप्तचे गुप्तचर अधिकारी म्हणाले की, आम्ही इस्रायलला ‘काहीतरी मोठ्या’ संकटाची चेतावणी दिली होती, मात्र इस्रायलने याकडे लक्ष दिले नाही. इस्रायलने हा दावा फेटाळला आहे.
इजिप्त अनेकदा इस्रायल आणि हमास यांच्यात मध्यस्थी करतो. खरेतर पूर्वी इजिप्त इस्रायलला त्याचा शत्रू मानत असे. इजिप्तनेही इस्रायलविरुद्ध अनेक युद्धे केली. तथापि इजिप्तने वर्ष १९७३ च्या अरब-इस्रायल युद्धानंतर केवळ ७ वर्षांनी इस्रायलला ‘राष्ट्र’ म्हणून मान्यता दिली. तेव्हापासून इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात मध्यस्थी करणारा देश म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.