रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात श्राद्धविधी करतांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पूर्वजांना गती दिल्‍याचे जाणवणे

सौ. वृंदा मराठे

१. ‘श्राद्धविधी करतांना पूर्वजांना घेऊन जाण्‍यासाठी सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आले आहेत’, असे दिसल्‍यावर भावजागृती होणे : ‘१६.९.२०२२ या दिवशी आश्रमात १५ साधकांनी श्र्राद्ध विधी केले. मी पिंडांसमोर उभे राहिले आणि डोळे मिटून नमस्‍कार केला. तेव्‍हा मी त्‍यांना प्रार्थना केली की, ‘आम्‍ही यथाशक्‍तीनुसार जेवढे शक्‍य आहे, तेवढे करण्‍याचा प्रयत्न केला आहे. यातून तुम्‍ही संतुष्‍ट होऊन आम्‍हाला आशीर्वाद द्यावेत. तुम्‍हाला सद़्‍गती मिळावी आणि आम्‍ही पूर्वजांच्‍या त्रासांतून मुक्‍त व्‍हावे.’ तिथे उभे राहून मी अशी ३ – ४ वेळा प्रार्थना केली. प्रार्थना करत असतांना दर्भाच्‍या टोकांकडे पाहिल्‍यावर मला तेथे परम पूज्‍य डॉक्‍टर (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) बसलेले दिसले आणि माझी भावजागृती झाली. ‘ते पूवर्जांना घेऊन जाण्‍यासाठी आले आहेत. प.पू. डॉक्‍टरांनी त्‍यांना सद़्‍गती दिली’, याची मला शाश्‍वती झाली.

२. पितृपक्षात मी दत्ताचा जप करतांना मला माझ्‍यासमोर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले दत्तगुरूंच्‍या वेशात दिसत होते.

३. १५.९.२०२२ या दिवशी ‘भक्‍तीसत्‍संगात श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेल्‍या चैतन्‍यमय मार्गदर्शनामुळे श्राद्धविधी भावपूर्ण झाले’, असे मला वाटले. सहभागी साधकांनाही ‘सर्व छान आणि सुरळीत झाले’, असे वाटले.’

– सौ. वृंदा मराठे, फोंडा, गोवा. (१९.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक