उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. श्रीवेद राहुल वनकर हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१८ मध्ये ‘कु. श्रीवेद राहुल वनकर उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून त्याची आध्यात्मिक पातळी ५७ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५८ टक्के झाली आहे. त्याच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, त्याची साधनेची तळमळ आणि त्याच्यातील भाव यांमुळे आता त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (९.८.२०२३) |
यवतमाळ येथील ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीवेद राहुल वनकर याचा भाद्रपद कृष्ण दशमी (९ ऑक्टोबर) या दिवशी आठवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे वडील श्री. राहुल वनकर यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. श्रीवेद राहुल वनकर याला आठव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !
१. शिकण्याची वृत्ती
‘आमच्या घरी संगीताचे वातावरण आहे; पण मी कु. श्रीवेदला कधीच संवादिनी (हार्मोनियम) आणि बासरी शिकवली नाही. तो स्वतःच संवादिनी आणि बासरी यांवर भजने वाजवायला शिकला आहे.
२. धर्माचरणाच्या कृती
अ. तो प्रतिदिन टिळा लावतोे.
आ. तो प्रतिदिन शुभंकरोती आणि स्तोत्र म्हणतो. ‘मला रामरक्षा शिकवा’, म्हणून मागे लागला आहे.
इ. तो मोठ्यांना नमस्कार करतो.
३. श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
अ. त्याला कुठलीही नवीन वस्तू दिल्यावर तो म्हणतो, ‘‘हे मला कृष्णाने किंवा प.पू. आजोबांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) दिले आहे.’’
आ. तो मला नेहमी म्हणतो, ‘‘बाबा, कृष्णच तुम्हाला पैसे देतो.’’
इ. परीक्षेला जातांना तो कृष्ण आणि परम पूज्य (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांना प्रार्थना करतो, ‘तुम्हीच मला सर्वकाही आठवून द्या आणि तुम्हीच माझ्याकडून प्रश्नपत्रिका लिहून घ्या.’’ तो घरी आल्यावर कृतज्ञता व्यक्त करतो.
ई. विजांचा कडकडाट झाल्यावर तो कृष्णाला प्रार्थना करतो, ‘देवा, हे वादळ थांबव’ आणि वादळ शांत झाल्यावर मला सांगतो, ‘‘कृष्णाने माझी प्रार्थना ऐकली.’’
उ. कधी कधी तो ‘आज प.पू. आजोबा माझ्या स्वप्नात आले’, असे सांगतो.
४. कु. श्रीवेदमध्ये जाणवलेले पालट
४ अ. राग न्यून होणे : त्याच्यातील समजूतदारपणा वाढला असून तो आता शांत झाला आहे. त्याला आता पूर्वीसारखा राग येत नाही.
४ आ. आसक्ती न्यून होणे : तो स्वतःला आवडणारे पदार्थ पटकन इतरांना देतो.
४ इ. प्रेमभाव वाढणे : त्याच्यात प्रेमभाव वाढला आहे. तो सर्वांची विचारपूस करतो.
५. स्वभावदोष : आळस, अव्यवस्थितपणा, धांदरटपणा, विसरभोळेपणा.’
– श्री. राहुल मुकुंदराव वनकर (कु. श्रीवेद वनकर याचे वडील), यवतमाळ. (१९.३.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |