
तेल अविव – हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणाच्या वेळी सीमेवर पकडलेल्या इस्रायलच्या एका महिला सैनिकाची नग्न धिंड काढल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला. या घटनेचा जगभरातून निषेध होत आहे. धिंड काढतांना हमासचे आतंकवादी ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशा घोषणा देत होते. विशेष म्हणजे या वेळी पॅलेस्टाईनमधील अल्पवयीन मुलेही ही धिंड पहातांना आनंद व्यक्त करत होते.
भारताने इस्रायलमधील नागरिकांसाठी प्रसारित केली मार्गदर्शिका !
हमासने इस्रायलवर केलेल्या आक्रमणानंतर भारताने इस्रायलमध्ये रहाणार्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शिका प्रसारित केली आहे. यात भारतीय नागरिकांना सतर्क रहण्याचे आवाहन केले आहे, तसेच इस्रायलच्या स्थानिक अधिकर्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रसारित केलेल्या नियमांचे पालन करण्याचा सल्लाही दिला आहे. ‘अनावश्यक हलचाली टाळा आणि सुरक्षित ठिकाणी रहा’, असे भारत सरकारने म्हटले आहे.
आम्ही इस्रायलच्या पाठीशी ! – अमेरिका
इस्रायलमधील हमासने केलेल्या आक्रमणाची छायाचित्रे आणि व्हिडिआ प्रसारित होत आहेत. यामध्ये मृत आणि घायाळ झालेल्या लोकांना पाहून मन विचलित होत आहे. या घटनेत आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे अमेरिकेने म्हटले आहे.
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे