Navratri  : श्री सरस्वतीदेवी

नवरात्री नवरात्रोत्सव नवरात्री२०२३ देवी दुर्गादेवी दुर्गा देवी #नवरात्री #नवरात्रोत्सव #नवरात्री२०२३ #देवी #दुर्गादेवी Navaratri Navratri Navaratrotsav Navratrotsav Durgadevi Durga Devi Devi #Navaratri #Navratri #Navaratrotsav #Navratrotsav #Durgadevi #Durga #Devi

१. व्युत्पत्ती आणि अर्थ

१ अ. ‘स्वरांवर आरूढ होणार्‍या शक्तीला ‘सरस्वती’ असे म्हणतात.’ – एक विद्वान [श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १६.६.२००६, दुपारी ४.५५]

१ आ. ‘सरसः अवती ।’, म्हणजे एका गतीत ज्ञान देणारी अर्थात गतीमती. निष्क्रीय ब्रह्माचे सक्रीय रूप; म्हणूनच तिला ‘ब्रह्मा-विष्णु-महेश या सर्वांना गती देणारी शक्ती’ असे म्हणतात.

२. काही इतर नावे

२ अ. कार्यानुसार नावे : ‘सरस्वती ही ब्रह्माची शक्ती असल्याने ती पूर्णतः उत्पत्तीस्वरूप आहे, म्हणजेच शब्दब्रह्म, तालब्रह्म अन् नादब्रह्म यांना आवश्यकतेप्रमाणे उत्पन्न करून ब्रह्मा, श्रीविष्णु आणि महेश या तीनही शक्तींच्या स्तरांवर गतीवाचक कार्य करणारी असल्याने तिला वाणीदायिनी (शब्दब्रह्म), स्वरदायिनी (तालब्रह्म) अन् ज्ञानदायिनी (नादब्रह्म) अशा तीन संज्ञांनी ओळखले जाते.’ – एक विद्वान [श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १४.१२.२००५, सकाळी ११.४७]

३. शारदा

३ अ. अर्थ : शारदा म्हणजे षट्शास्त्रांच्या अध्ययनाला आधार देणारी, म्हणजे ज्ञानाला आधार देणारी.

३ आ. वैशिष्ट्ये

३ आ १. या देवीची शक्ती श्री गणपतीशी संबंधित असते.

३ आ २.  या देवीच्या साडीचा रंग लालसर गुलाबी असतो.

३ आ ३.  वाक्, वाग्देवी, वागीश्वरी, वाणी, भारती, वीणापाणि इत्यादी.

४. महासरस्वतीदेवी

४ अ. : ‘श्रीविष्णूपासून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. तेव्हा ९५ टक्के ब्रह्मतत्त्व निर्गुण (अकार्यरत) अवस्थेत अन् केवळ ५ टक्के ब्रह्मतत्त्व सगुण (कार्यरत) अवस्थेत होते. संपूर्ण ब्रह्मांडाच्या निर्मितीसाठी निर्गुण ब्रह्मतत्त्व ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणावर कार्यरत होणे अपेक्षित होते. ब्रह्मतत्त्वाला कार्यरत करण्यासाठी महासरस्वतीदेवीची निर्मिती करण्यात आली.

४ आ. वैशिष्ट्ये

४ आ १. श्री सरस्वतीदेवीचे निर्गुण तत्त्व जास्त असणारे रूप

४ आ २. श्री सरस्वतीदेवीचे विश्वव्यापी रूप

४ इ. निवास : सरस्वतीलोक हा ब्रह्मलोकाचा शक्तीरूपी उपभाग आहे. सर्व देवतांचे लोक हे ‘सगुण लोक’ या संज्ञेने ओळखले जातात. या लोकांतून त्या त्या स्तरावर देवता प्रत्यक्ष सगुण रूप धारण करून कार्य करतात. वरिष्ठ स्तरावरील निर्गुण लोक हा प्रकाशमय, म्हणजेच तत्त्वरूपी आहे. सगुण लोकापेक्षा निर्गुण लोक सूक्ष्म आहे. सरस्वतीचे तारक अथवा मारक तत्त्व (म्हणजे महासरस्वती) कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे सरस्वतीलोकातून प्रकट होऊन व्यष्टी अथवा समष्टी स्तरावर कार्य करते.

४ ई. कार्य : महासरस्वतीदेवीची निर्मिती झाल्यावर ब्रह्मतत्त्व ५० टक्के इतके कार्यरत झाले. त्यातून सूक्ष्म-जगत, विविध सूक्ष्म-लोक, देवतांची तत्त्वे या सर्व सूक्ष्मातीसूक्ष्म आणि सूक्ष्मतम गोष्टींची निर्मिती झाली. ही ब्रह्मांडाची निर्गुण स्तरावरील निर्मिती होय.

५. महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली

प्रकृतीरूप त्रिगुणात्मक शक्तीला ‘अपराशक्ती’ असे म्हटले आहे. (एका विचारसरणीनुसार) सत्त्व, रज आणि तम अशी त्रिगुणात्मक शक्ती व्यक्त होते, तेव्हा ती महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांची रूपे धारण करते. या तीन शक्तींमुळेच ब्रह्मा, श्रीविष्णु आणि महेश कार्यरत होऊन अनुक्रमे उत्पत्ती, स्थिती आणि संहार यांसंबंधीचे कार्य करतात.

श्री दुर्गासप्तशतीनुसार महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही दुर्गेची प्रमुख रूपे आहेत. ‘महाकाली हे ‘काल’तत्त्वाचे, महासरस्वती हे ‘गती’तत्त्वाचे आणि महालक्ष्मी हे ‘दिक्’ (दिशा) तत्त्वाचे प्रतीक आहे. कालाच्या उदरात सर्व पदार्थमात्रांचा विनाश होतो. जेथे गती नाही, तेथे निर्मितीची प्रक्रियाच खुंटते. तरीही जगताची निर्मिती, पालनपोषण आणि संवर्धन यांसाठी अष्टदिशांतर्गत एकप्रकारची शक्ती सदैव कार्यरत रहाते, हीच आद्याशक्ती होय. वरील तीनही तत्त्वे या महाशक्तीत अनुस्यूत (अखंडित) असतात.

६. उपासना

६ अ. श्री सरस्वतीदेवीची उपासना करण्यासाठी उपासकात आवश्यक असलेले गुण आणि घटक

६ अ १. जिज्ञासा आणि शिकण्याची वृत्ती : ज्ञान हे अनंत असल्यामुळे संपूर्ण ज्ञान ग्रहण करण्यासाठी उपासकात सातत्याने जिज्ञासा अन् इतरांकडून शिकण्याची वृत्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. आध्यात्मिक पातळी अल्प असतांनाही या गुणांमुळे जीव पुढच्या पुढच्या टप्प्याचे ज्ञान, कला आणि विद्या प्राप्त करू शकतो.

६ अ २. तीव्र तळमळ : तीव्र तळमळ असल्यावर जिवाची आध्यात्मिक पातळी अल्प असतांनाही त्याला ज्ञान ग्रहण करता येते.

६ अ ३. मार्गदर्शन घेणे : उपासकाने देवतांची उपासना करण्यासमवेतच गुरूंचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक असते. मार्गदर्शन घेत राहिल्याने त्याच्याकडून होणार्‍या चुका आणि त्रुटी लक्षात येऊन त्या त्वरित सुधारल्या जाऊ शकतात. त्यामुळे त्याच्या जीवनातील कित्येक वर्षे वाया जाण्यापासून वाचतात.

६ अ ४. चिकाटी आणि सातत्य ठेवणे : ज्ञान, कला अथवा विद्या एका दिवसात ग्रहण करता येत नाहीत. (श्रीकृष्णासारखे अवतारच एका दिवसात विविध विद्या ग्रहण करू शकतात.) यासाठी उपासकात चिकाटी आणि सातत्य असणे अत्यंत आवश्यक असते. चिकाटी आणि सातत्य यांमुळे कलाकारांना सात्त्विक रचना करता येतात.

६ अ ५. एकाग्रता : उपासकात एकाग्रता असल्यास त्याला श्री सरस्वतीदेवीची उपासना चांगल्या प्रकारे करून अल्प कालावधीत अधिकाधिक ज्ञान ग्रहण करता येते.

६ अ ६. धर्माचरणी आणि सदाचरणी असणे : श्री सरस्वती-देवीकडून प्राप्त झालेले ज्ञान, विद्या आणि कला यांचा योग्य वापर करण्यासाठी उपासकाने धर्माचरण करून सदाचरणी असणे अत्यंत आवश्यक असते. अधर्माने आचरण करणार्‍याकडून बहुतेक वेळा ज्ञान, विद्या आणि कला यांचा दुरुपयोग होतो. त्यामुळे तो श्री सरस्वतीदेवीकडून पुढील टप्प्याचे ज्ञान, कला आणि विद्या प्राप्त करू शकत नाही. उलट तो तिच्या अवकृपेस पात्र ठरतो.

६ अ ७. साधना : उच्च टप्प्याचे ज्ञान ग्रहण करण्यासाठी उपासकाने सातत्याने साधना करत रहाणे अत्यंत आवश्यक असते. साधनेने ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वाढते. ज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी सात्त्विक बुद्धीची आवश्यकता असते. साधना सतत केल्याने बुद्धी सात्त्विक बनण्यास साहाय्य होते.

६ अ ८. विनम्रता, अल्प अहं, शरणागत भाव आणि कृतज्ञतेचा भाव : ‘विद्या विनयेन शोभते ।’ या उक्तीप्रमाणे श्री सरस्वतीदेवीला अहं अल्प असलेला उपासक अधिक आवडतो. विनम्र, शरणागत भाव आणि कृतज्ञतेचा भाव असलेल्या उपासकाने मागणी केलेली नसतांनाही श्री सरस्वतीदेवी त्याला स्वतःहून जास्त ज्ञान आणि विद्या देते.

(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘श्री सरस्वतीदेवी’)

सरस्वतीचे पूजन आणि आराधना

ब्राह्मणग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अमित तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा अन् आराधना यांसाठी माघ मासातील (महिन्यातील) पंचमी ही तिथी निश्चित केली गेली आहे. वसंतपंचमीला तिचा आविर्भाव दिवस मानला जातो. त्यामुळे ‘वागीश्वरी जयंती’ आणि ‘श्रीपंचमी’ या नावानेही ही तिथी प्रसिद्ध आहे. (संदर्भ : संकेतस्थळ)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.