१० ऑक्टोबरपर्यंत अधिकारी परत न गेल्यास त्यांच्या सवलती बंद होणार !
नवी देहली – भारत आणि कॅनडा यांच्यातील खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येवरून चालू झालेला वाद आता आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. भारताने कॅनडाला त्याच्या ४१ राजनैतिक अधिकार्यांना परत बोलावण्यास सांगितले आहे. यासाठी १० ऑक्टोबरची समयमर्यादा देण्यात आली आहे. ‘यानंतरही जे अधिकारी भारतातून परत जाणार नाहीत, त्यांना भारताकडून देण्यात येणार्या सवलती आणि इतर लाभ बंद केले जाणार आहेत’, असे भारताकडून सांगण्यात आले आहे. सध्या भारतात कॅनडाचे ६२ राजनैतिक अधिकारी काम करत आहेत.
निज्जर मामले में और सख्त हुआ भारत, कनाडा से 41 राजनयिकों को वापस बुलाने का लिया फैसला#IndiaCanadaRow #IndiaCanadaTension #Bharat https://t.co/i8sVgMUs6O
— Dainik Jagran (@JagranNews) October 3, 2023
निज्जर हत्येवरून कॅनडाने भारतावर आरोप करत कॅनडातील भारतीय अधिकारी प्रमोद रॉय यांना कॅनडा सोडून जाण्यास सांगितले होते. त्यानंतर भारतानेही कॅनडाच्या अधिकार्याला देश सोडून जाण्यास सांगितले होते. त्या वेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते, ‘आम्ही कॅनडाला स्पष्टपणे सांगितले आहे की, दोन्ही देशांमध्ये राजनैतिकांची संख्या समान असावी. व्हिएन्ना करारानुसार हे आवश्यक आहे.’ यानंतर भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवाही बंद केली.

Trump Threatens China-Russia : रशिया आणि चीन इराण युद्धात उतरले, तर गंभीर परिणाम होतील !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
Bangladesh Terror Attack Threat : ढाका (बांगलादेश) येथे जगन्नाथ रथयात्रेत बाँबस्फोट करण्याचा प्रयत्न उघड
बांगलादेशामध्ये शरणागती पत्करतांना लाज वाटली नाही का ? – Maulana Fazlur Rahman
India China Dispute : चीनने भारताच्या जम्मू-काश्मीर आणि लडाख येथील भागांवर अवैध नियंत्रण मिळवले आहे !
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण