पुण्‍यातील गणेशोत्‍सवात देखाव्‍यासाठी मोदी, फडणवीस आणि अनेक नेत्‍यांच्‍या प्रतिकृती !

पुणे – राजकीय आखाड्याचे देखावे यंदा पुण्‍यात दिसणार आहेत. सरकारमधील काही नेते यंदा पुण्‍यातील गणेशोत्‍सवाच्‍या देखाव्‍यामध्‍ये पहायला मिळणार आहेत. राजकीय घडामोडी आणि संघर्ष या देखाव्‍यांमधून दाखवण्‍यात येणार आहे. पुण्‍याचे प्रसिद्ध कलाकार सतीश तारु यांच्‍या स्‍टुडिओत हा देखावा सिद्ध केला जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्‍या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. या प्रतिकृतींचे काम सध्‍या अंतिम टप्‍प्‍यात आहे.

अफझलखानाचा वध, शिवरायांचा प्रताप, शिवराज्‍याभिषेक सोहळा यांसारखे देखावे भाविकांचे लक्ष वेधून घेतात; मात्र यावर्षी सत्तासंघर्षाचा देखावा लक्ष वेधून घेणार असल्‍याची चर्चा आहे, तसेच राजाराम मंडळात प्रतिवर्षी देशातील महत्त्वाच्‍या मंदिराची प्रतिकृती साकारण्‍यात येते. यंदा हे मंडळ शेगावच्‍या गजानन महाराज मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे.