ठाणे, १२ सप्टेंबर (वार्ता.) – गांजाची तस्करी करणारा एकजण खारेगाव पथकर नाक्याकडून रेतीबंदर-मुंब्रा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. त्या वेळी तेथे आलेल्या महंमद निजाम रज्जाक अली (वय २७ वर्षे) याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे ५ किलो १५८ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ, ‘व्हिवो’ आस्थापनाचा भ्रमणभाषसंच आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ३२ सहस्त्र ५९० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाअमली पदार्थांची विक्री करणार्या धर्मांधांची मोठी यंत्रणा पोलीस प्रशासन कधी नष्ट करणार आहे ? |