काँग्रेसचे सोनिया आणि राहुल गांधी ऑलिंपिक खेळाडूंना नाही, तर चिनी नेत्‍यांना भेटले !

देशद्रोही काँग्रेसचे खरे स्‍वरूप जाणा !

कर्नल राज्‍यवर्धन सिंह राठोड संसदेत म्‍हणाले की, वर्ष २००८ मध्‍ये बीजिंग (चीन) येथे ऑलिंपिकच्‍या स्‍पर्धा झाल्‍या, त्‍यात मी सहभागी होतो. आम्‍हाला बातमी मिळाली होती की, काँग्रेसच्‍या नेत्‍या खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी आम्‍हा खेळाडूंना भेटायला येणार आहेत. आम्‍ही वाट पाहिली; पण ते आलेच नाहीत. नंतर समजले की, त्‍यांना चीनच्‍या कम्‍युनिस्‍ट (साम्‍यवादी) पक्षाचे (‘सीपीसी’चे) निमंत्रण होते आणि ते त्‍यांना भेटायलाच चीनमध्‍ये आले होते. जर एखाद्या सैनिकाने असा व्‍यवहार करण्‍याचा प्रयत्न केला, तर त्‍याच्‍यावर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंदवून खटला चालवला जातो. मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी, हे तर त्‍या वेळी सरकार चालवत होते. त्‍यांच्‍यावरही देशद्रोहाचा खटला चालवला गेला पाहिजे.

सोनिया गांधी यांचे नेतृत्‍व असलेली काँग्रेस आणि चीनची सत्ताधारी कम्‍युनिस्‍ट पार्टी यांच्‍यात ७ ऑगस्‍ट २००८ मध्‍ये एक सामंजस्‍य करार झाला होता. या सामंजस्‍य करारावर काँग्रेसचे तत्‍कालीन महासचिव राहुल गांधी आणि चीनचे त्‍या वेळचे पक्षाचे उपाध्‍यक्ष अन् ‘सीपीसी’च्‍या पॉलीट ब्‍युरो’च्‍या स्‍थायी समितीचे सदस्‍य असलेले शी जिनपिंग यांनी स्‍वाक्षरी केली होती. या स्‍वाक्षर्‍या होण्‍यापूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी जिनपिंग आणि त्‍यांच्‍या पार्टीच्‍या अन्‍य वरिष्‍ठ नेत्‍यांसमवेत स्‍वहिताच्‍या गोष्‍टींवर प्रदीर्घ चर्चा केली होती.

(साभार : ‘ऑपइंडिया’चे वृत्तसंकेतस्‍थळ आणि साप्‍ताहिक ‘सांस्‍कृतिक वार्तापत्र’)