हवाईसुंदरीची हत्‍या करणार्‍या आरोपीची कारागृहात आत्‍महत्‍या !

मुंबई – हवाईसुंदरी रूपलच्‍या हत्‍या प्रकरणातील आरोपी विक्रम अटवाल याने अंधेरी परिसरातील कारागृहात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. विक्रमला या प्रकरणी ८ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली होती. त्‍यानुसार ८ सप्‍टेंबर या दिवशी त्‍याला न्‍यायालयात उपस्‍थित करण्‍यात येणार होते. पवई येथे रहाणार्‍या रूपल आग्रे नावाच्‍या हवाईसुंदरीच्‍या हत्‍येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक केली होती.