(म्हणे) ‘रा.स्व. संघ म्हणजे राष्ट्रीय खोटारड्यांचा संघ !-कर्नाटकातील साहित्यिक प्रा. के.एस्. भगवान

  • कर्नाटकातील साहित्यिक प्रा. के.एस्. भगवान यांची बौद्धिक दिवाळखोरी !

  • ‘महिषा दसरा समिती’ यावर्षी राज्यात महिषा दसरा साजर करणार !  


मैसुरू (कर्नाटक) – देशातील प्रसिद्ध असलेला रा.स्व. संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसून केवळ खोट्याचा प्रचार करणारा राष्ट्रीय खोटारड्यांचा संघ आहे, असे बालीश विधान प्रा. के.एस्. भगवान यांनी येथे ‘महिषा दसरा समिती’ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.

१. मैसुरूचे माजी महापौर पुरुषोत्तम या वेळी म्हणाले की, ‘महिषा दसरा’ साजरा करण्यासाठी १ मास आधी विचारविनिमयाचे, परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. दसर्‍याला विरोध करण्यासाठी ‘महिषा दसरा’ साजरा करत नसून याद्वारे महिषाविषयी संपूर्ण देशात माहितीचा प्रसार करणार आहोत. ‘आम्ही दिलेली माहिती चुकीची आहे’, असे सिद्ध झाल्यास पुन्हा ‘महिषा दसरा’ साजरा करणार नाही.

‘महिषा दसरा’ साजरा करायला विरोध

२. पत्रकार परिषदेत प्रा. महेशचंद्र गुरु म्हणाले की, राज्यात हिंदुत्वनिष्ठ ‘महिषा दसरा’ साजरा करायला विरोध करत आहेत. गुलबर्गा, मैसुरू, बेंगळुरू यांसह इतर विश्‍वविद्यालयांमध्ये ‘महिषा अध्ययन पिठा’ची स्थापना करावी, असे शासनाला सांगणार आहोत. राज्यात हिंदुत्वनिष्ठ नसलेले सरकार अस्तित्वात आले आहे; परंतु सत्ताधीश उच्च जातीचे आहेत. दलितांची प्रगती त्यांच्याकडून होणे शक्यच नाही. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी दलितांसाठी कधीच आवाज उठवलेला नाही. ते संधीसाधू आहेत. त्यांना अनुकूल असे राजकारण ते करतात.

संपादकीय भूमिका

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनेला ‘खोटारडे’ म्हणणारे पुरो(अधो)गामी यांचा इतिहास पडताळला, तर त्यात खोट्याविना आणखीही काहीही सापडणार नाही, हे लक्षात घ्या !
  • ‘महिषा दसरा’सारखा हिंदुविरोधी उत्सव साजरा करून अत्याचारी महिषासुराचा उदो उदो करणारे कोणत्या मानसिकतेचे आहेत, हेच लक्षात येते ! अशांना भाजपच्या राज्यात उत्सव साजरा करण्याला बंदी होती; मात्र काँग्रेस सरकार आल्यावर त्यांचे फावते आहे ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे मान्य आहे का ?