श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडे प्रस्ताव !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिराचे काम युद्धपातळीवर चालू आहे. या मंदिरासाठी ५०० वर्षे हिंदूंकडून आंदोलन करण्यात येत होते. यात सहस्रो हिंदूंनी प्राणांचा त्याग केला. या रामभक्तांचा योग्य सन्मान करण्याचा प्रस्ताव श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासासमोर ठेवण्यात आला आहे. यात अशा रामभक्तांचे पुतळे ठिकठिकाणी उभारणे, येथील चौक आणि रस्ते यांनी त्यांची नावे देणे, अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यात येत आहे.
Ram Mandir: राम मंदिर आंदोलन में गोली खाने वालों को ऐसे मिलेगा सम्मान, ट्रस्ट कर रहा तैयारी#RamMandir #Ayodhya #RamMandirMovementhttps://t.co/R5fDAUtZhr
— Amar Ujala (@AmarUjalaNews) August 17, 2023
श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात सहस्रो लोकांनी बलीदान दिले असल्याने आणि त्यांची माहितीही मिळणे कठीण असल्याने त्यांचे पुतळे उभारणे शक्य होणार नाही, असे सूत्र उपस्थित करण्यात आले आहे. श्रीराममंदिर उभारण्यासाठी बलीदान दिलेल्यांची अगदी अचूक माहिती आहे, त्यांना आंदोलनाविषयीचे संग्रहालय बनवून त्यात स्थान दिले जाऊ शकते, असाही प्रस्ताव न्यासाकडे आला आहे.

न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा