|
धनबाद (झारखंड) – येथील तेतुलमारी भागातील सेंट झेवियर्स शाळेमध्ये टिकली लावून येणार्या हिंदु विद्यार्थिनीला शिक्षिकेने भर वर्गात मारहाण केली. याविषयी विचारणा करण्यास आलेल्या विद्यार्थिनीच्या आईला मुख्याध्यापकांनी अपकीर्त करून शाळेतून हाकलून लावले. यामुळे अपमानित झालेल्या विद्यार्थिनीने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १० जुलै या दिवशी घडली. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने एक चिठ्ठी लिहिली होती. या घटनेनंतर गावकर्यांनी शाळेच्या बाहेर निदर्शने केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षिका यांना अटक केली आहे. या प्रकरणाची नोंद राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगानेही घेतली आहे.
बिंदी लगाकर सेंट जेवियर्स में पढ़ने गई छात्रा, टीचर ने सरेआम मारे थप्पड़; प्रिंसिपल ने स्कूल से भगाया: फाँसी लगाकर मर गई, NCPCR करेगी जाँच#Jharkhand #Suicide https://t.co/CkNH8UhAKJ
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 12, 2023
झारखंडचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी ट्वीट करून शाळेची मान्यता रहित करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे. मरांडी यांनी म्हटले की, अशा शाळांना सनातनच्या प्रतीकांविषयी इतका द्वेष का आहे, हे कळत नाही.
एक समाचार सुनकर दिल दहल गया है। धनबाद के सेंट जेवियर्स स्कूल में पढ़ने वाली 10वीं की छात्रा ने आत्महत्या कर ली है। छात्रा ने अपने यूनिफॉर्म में सुसाइड नोट लिखकर रखा था। खुलासा हुआ है कि छात्रा बिंदी लगाकर स्कूल गई थी, इसे लेकर वहाँ की एक शिक्षिका ने उसे पीटा और अपमानित किया। इससे…
— Babulal Marandi (@yourBabulal) July 11, 2023
संपादकीय भूमिका
|