सांगली – विवाहाचे आमीष दाखवून वसीम शब्बीर ऐनापुरे याने बलात्कार केल्याची तक्रार महिला पोलिसाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी वसीमचे वडील शब्बीर महबूब ऐनापुरे यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वसीमला पोलिसांनी अटक केली असून त्याला ४ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली आहे ! (ज्या विभागाकडे नागरिकांनी दाद मागायची त्या विभागातील पोलीसच जर बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये सहभागी असतील, तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा ? पोलीसदलातील महिलाही ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत असून याविरोधात आता कठोर कायद्याची अत्यावश्यकता लक्षात येते ! – संपादक)
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पीडित महिला सांगली पोलीस दलात कार्यरत असून सांगली पोलीस बँड पथकातील वसीम ऐनापुरे याच्यासमवेत तिची ओळख झाली. विवाहाचे आमीष दाखवून वसीमने पीडितेसमवेत ओळख वाढवली. यानंतर वसीमने तिच्या इच्छेविरुद्ध ४ मार्च ते ६ जुलै या कालावधीत विविध शहरांत नेऊन बलात्कार केला. यात पीडित महिला गर्भवती राहिली. पीडिता गर्भवती असल्याचे समजल्यानंतर संशयित वसीम याने तिचा गर्भपात करण्यासाठी बळजोरीने गोळ्या खाण्यास भाग पाडले. इतके सगळे झाल्यावर पीडितेने तक्रार करू नये; म्हणून वसीमच्या वडिलांनी पीडितेच्या भावाला दूरभाष करून धमकी दिली, असे पीडितेने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिका :
|