चीनमध्ये घरगुती हिंसाचाराची भीषण प्रकरणे उघड !

हाँगकाँग – चीनकडून नेहमीच तो स्त्री समानता आणि महिला हक्क यांविषयी सजग आहे, असा दावा केला जातो; मात्र त्यातील फोलपणा उघड झाला आहे. चीनमध्ये घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. प्रतिदिन एक ना एक भयानक प्रकरण लोकांसमोर येत आहे. दिवसाढवळ्या महिलांच्या खुनाच्या घटना घडत आहेत. चीनमध्ये सामाजिक माध्यमांद्वारे मुलींना लग्न आणि बाळंतपण यांपासून दूर राहून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. ‘चीनमध्ये प्रत्येक जण लग्नाला घाबरतो आहे’, असे मत काहींनी व्यक्त केले आहे. २६ जून २०२३ या दिवशी सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती तिच्या पत्नीवर वारंवार गाडीने आक्रमण करत असल्याचे दिसत आहे. या व्यक्तीने पत्नी मरेपर्यंत तिच्यावर गाडी चालवली. गेल्या मासात चीनमधील ग्वांगडोंग प्रांतात एका व्यक्तीने तिची पत्नी आणि मेव्हणी यांची चाकूने भोसकून हत्या केली होती.

संपादकीय भूमिका 

भारतातील साम्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? साम्यवाद हा समानता शिकवतो. त्याचे माहेरघर असणार्‍या चीनमधील ही स्थिती साम्यवाद्यांचे खरे स्वरूप उघड करते !