चीनने जैविक शस्त्र म्हणून बनवला होता ‘कोरोना’ विषाणू ! – चिनी शास्त्रज्ञ

चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतील चिनी शास्त्रज्ञाचा दावा !

नवी देहली – चीनमधील वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञाने दावा केला आहे, ‘चीननेच कोविड-१९ हा विषाणू जैविक शस्त्र म्हणून बनवला होता. चीननेच हा विषाणू जाणीवपूर्वक संक्रमित केला.’ शास्त्रज्ञ चाओ शाओ यांनी इंटरनॅशनल प्रेस असोसिएशन’चे सदस्य जेनिफर जेंग यांच्या समवेत एका मुलाखतीत हा दावा केला आहे. विशेष म्हणजे चीनवर यापूर्वीही अशा प्रकारचे आरोप करण्यात आले होते. चीनने प्रत्येक वेळी हे आरोप फेटाळत कोरोना विषाणू त्याच्या मांस विक्रीच्या बाजारातून पसरल्याचा दावा केला आहे.

१. शास्त्रज्ञ शाओ म्हणाले की, चीनने वुहान प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांना अत्यंत प्रभावी विषाणू शोधण्यास सांगितले होते. माझे तेथील सहकारी शान चाओ यांनी सांगितले होते की, एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने त्याला कोरोना विषाणूचे ४ प्रकार दिले होते. यातील कोणता अधिक वेगाने पसरू शकतो ?, हे शोधण्यास सांगितले होते.

२. चाओ शाओ यांनी सांगितले की, त्यांचे काही सहकारी वर्ष २०१९ मध्ये वुहानमध्ये आयोजित विश्‍व सैन्य स्पर्धेच्या वेळी गायब झाले होते. ते सर्व विविध देशांतून आलेल्या खेळाडूंची तपासणी करण्यासाठी विविध हॉटेलमध्ये गेले होते. कोणत्याही व्यक्तीच्या तपासणीसाठी शास्त्रज्ञांना पाठवले जात नाही, तर डॉक्टर जातात. या शास्त्रज्ञांना कोरोनाचे विषाणू पसरवण्यासाठी पाठवण्यात आले होते. एप्रिल २०२० मध्ये मला शिनजियांग प्रांतामधील कारागृहात असणार्‍या उघूर मुसलमानांची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. आरोग्याची तापसणी करून त्यांची लवकर सुटका करा, असे त्यांना सांगण्यात आले होते.