५ नवीन वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ !
भोपाळ (मध्यप्रदेश) – इस्लामचा तिहेरी तलाकशी काहीही संबंध नाही. त्याला पाठिंबा देणारे मतांसाठी राजकारण करत आहेत. एक घर दोन कायद्यांवर चालू शकत नाही. भाजप समान नागरी कायद्याविषयी संभ्रम भाजप दूर करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी येथे केले. येथील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून त्यांनी देशातील ५ वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या वेळी बोलतांना पंतप्रधान मोदी यांनी बिहारमध्ये झालेल्या देशातील विरोधी पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीवरही टीका केली. ‘या सर्व पक्षांच्या घोटाळ्यांचा आकडा एकत्र केला, तर २० लाख कोटी रुपयांचा घोटाळा होण्याची निश्चिती आहे’ असा दावा त्यांनी केला.
कॉमन सिविल कोड का विरोध करने वालों से जुड़ा है, उत्तर प्रदेश की रानी चौरसिया जी का सवाल। अगर वोटबैंक की राजनीति करने वाले मुसलमानों के हितैषी होते तो हमारे मुस्लिम भाई-बहन शिक्षा, रोजगार में पीछे न रहते और मुसीबत की जिंदगी जीने को मजबूर न होते।https://t.co/lk3h1CF51V
— Narendra Modi (@narendramodi) June 27, 2023
या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी यांनी मोतीलाल नेहरू स्टेडियममध्ये ‘माझे बूथ, सर्वांत मजबूत’ या भाजपच्या मोहिमेअंतर्गत ५४३ लोकसभा आणि मध्यप्रदेशातील ६४ सहस्र १०० बूथच्या १० लाख कार्यकर्त्यांना डिजिटल पद्धतीने संबोधित केले. सर्व राज्यांतील विधानसभा मतदारसंघातील ३ सहस्र कार्यकर्तेही येथे उपस्थित होते.
५ नवीन वंदे भारत एक्सप्रेस
मध्यप्रदेशसाठी भोपाळ-इंदूर आणि राणी कमलापती-जबलपूर असे दोन वंदे भारत एक्सप्रेसचे मार्ग आहेत. रांची-पाटणा, धारवाड-बेंगळुरू आणि मडगाव-मुंबई या उर्वरित ३ वंदे भारत एक्सप्रेस आहेत. देशात सध्या एकूण १८ वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.


‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती