गोवा : छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी वास्को येथील एका ख्रिस्त्याला अटक

पोलिसांनी संशयित रोनाल्डो डिसोझा याला घेतले कह्यात

वास्को, २१ जून (वार्ता.) – कळंगुट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्याच्या आदेशावरून झालेल्या आंदोलनानंतर २१ जून या दिवशी सायंकाळी वाडे, वास्को येथील रोनाल्डो डिसोझा याने सामाजिक माध्यमावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली. ही पोस्ट हिंदु समाजाच्या भावना दुखावणारी होती आणि यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी संबंधित युवकाला कह्यात घेण्याची मागणी वास्को पोलिसांकडे केली होती. त्यानंतर पोलिसांनी संशयित रोनाल्डो डिसोझा याला कह्यात घेतले आहे. वास्को पोलीस ठाण्याचे निरीक्षक कपिल नायक या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.

 (सौजन्य : Goan Reporter News)

धार्मिक सलोखा बिघडवणारी कृती खपवून घेणार नाही ! – कपिल नायक, पोलीस निरीक्षक, वास्को

धार्मिक सलोखा बिघडवणारे प्रत्यक्ष केलेले विधान किंवा यासंबंधी सामाजिक माध्यमात ‘पोस्ट’ प्रसारित केल्यास हा प्रकार खपवून घेणार नाही. अशा वेळी पोलीस योग्य कारवाई करणार, अशी चेतावणी वास्को पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी वृत्तवाहिन्यांच्या आधारे दिली आहे.

दगडफेक केल्याच्या प्रकरणी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांच्याकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट

पणजी – कळंगुट पंचायतीने शिवरायांचा पुतळा हटवण्याचा आदेश दिल्यानंतर शिवप्रेमींनी २० जून या दिवशी आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या वेळी काही अज्ञातांनी पंचायत कार्यालय आणि तेथील वाहने यांच्यावर दगडफेक केली होती. या प्रकरणी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे.

संपादकीय भूमिका

  • यातून ख्रिस्त्यांचा छत्रपती शिवरायांविषयीचा द्वेष दिसून येतो !
  • हिंदूंच्या मागण्यांमुळे गोव्यातील धार्मिक सलोख बिघडत असल्याचे सांगणारे खासदार सार्दिन ख्रिस्त्याच्या या आक्षेपार्ह पोस्टविषयी गप्प का ?