कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर तेथे काँग्रेसची हिंदुविरोधी मानसिकता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. ‘आतंकवाद्यांनी स्थानिक मुसलमानांचे साहाय्य घेऊन जसे काश्मीरमधून हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडले, तशी अवस्था आता काँग्रेसने सत्ता मिळवलेल्या राज्यात होईल का ?’, असा संशय कर्नाटकातील स्थिती पाहून निर्माण होत आहे. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे मुसलमानांवरील प्रेम आणि मुसलमानांची मतपेढी. आपल्याच घरातून हिंदूंना बाहेर काढणारी ही काँग्रेसी विचारसरणी कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पुन्हा उफाळून आली आहे. ज्या हिंदूंच्या मतांवर काँग्रेसने अर्धे शतक भारतावर राज्य केले, त्याच काँग्रेसने आता हिंदूंनाच संपवण्याचा विडा उचलला आहे, हे कर्नाटकातील घटनांवरून सिद्ध होत आहे. कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने हिजाब बंदी, धर्मांतर बंदी कायदा, राष्ट्रपुरुषांचे धडे, असे भाजपने घेतलेले सर्व निर्णय पालटण्याचे धोरण ठरवले. कर्नाटकमध्ये सत्तेवर येताच काँग्रेसने तिचा गलिच्छ तुष्टीकरणाचा खेळ पुन्हा चालू केला असून भाजप सरकारने आणलेला धर्मांतरविरोधी कायदा रहित करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे, तर पाठ्यपुस्तकांमधून रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडे काढून टाकण्यासाठीही मान्यता दिली आहे. त्यामुळे हिंदुत्वाविषयी काँग्रेसच्या मनात किती विखारी द्वेष भरला आहे, हे यावरून सहज लक्षात येते.
काँग्रेसने या देशात सत्तेमध्ये असतांना हिंदूंची कायम उपेक्षा करून त्यांना सतत दाबण्याचा प्रयत्न केला. सत्तेची लालसा अन् खुर्चीच्या मोहापायी देश स्वतंत्र झाल्यापासून ते वर्ष २०१४ पर्यंत काँग्रेसने देशांतर्गत अनेक समस्या निर्माण केल्या. त्याचे परिणाम नागरिकांना अजूनही भोगावे लागत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांचे मुसलमानांवर असलेल्या प्रेमामुळे आणि त्या नेत्यांच्या नाकर्तेपणामुळेच काश्मीरमधील लाखो हिंदूंना स्वतःच्या प्राणांचे बलीदान द्यावे लागले. ‘कायम हिंदु आणि हिंदुत्वाविषयी नकारात्मक भावना बाळगणारी ही काँग्रेस वर्ष २०१४ नंतर जर केंद्रामध्ये सत्तेत आली असती, तर येथील हिंदूंचे काय हाल झाले असते ?’, याची कल्पनाही न केलेली बरी ! सत्तेविना काँग्रेस तिचे अस्तित्व टिकवू शकत नाही.
काँग्रेसची कुसंस्कृती
आता देशातील ४ राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसने कर्नाटकप्रमाणे तेथेही मुसलमानांचे लांगूलचालन करून हिंदूंचे खच्चीकरण करण्याला प्रारंभ केल्यास आश्चर्य वाटू नये. सध्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर पक्षांना समवेत घेऊन केंद्रात काँग्रेसचे सरकार आणण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमधील राहुल गांधीसारखे नेते आणि आतून पूर्णपणे खिळखिळी झालेली काँग्रेस या देशाचा डोलारा सांभाळू शकत नाही, हे येथील मतदाराने पूर्णपणे ओळखले आहे. काँग्रेसला या देशाची संस्कृती, उज्ज्वल परंपरा आणि मातीशी काहीही देणे-घेणे नाही. निव्वळ घराणेशाही टिकवून स्वतःचा स्वार्थ साधून इतरांचे शोषण करणे हीच त्यांची एकमेव (कु)संस्कृती. त्यामुळेच वर्ष २०१४ मध्ये मतदारांनी काँग्रेसला धडा शिकवून घरी बसवले. डोक्यावरून एवढे पाणी वाहून गेल्यावरही काँग्रेस शहाणी झाली नाही, हे त्यांचेच दुर्दैव.
वैचारिक लढ्याची आवश्यकता !
लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल प्रमाणपत्र, काशी-मथुरा मुक्ती, धर्मांतर, गोहत्या, मंदिर संस्कृतीचे रक्षण, राष्ट्रपुरुषांचा अवमान अशा विविध विषयांवरून हिंदूंमध्ये जागृती झाल्याने अनेक ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मोर्चे निघत आहेत, तर काही ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांच्या आधारावर सत्ता मिळवलेल्या काँग्रेसचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार हे हिंदूंच्या मागण्या धुडकावून त्यांचे खच्चीकरण करत आहेत. त्यामुळे येथून पुढे संत, महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदू यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडून आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी हिंदूंनी स्वतःचे संरक्षण करणारे अन् हिंदूंचे प्रत्यक्ष कृतीद्वारे भले करणारे राज्यकर्ते निवडून देणे आवश्यक आहे. असे झाले, तर देशात हिंदु राष्ट्र येईल. हिंदूंनी जाती आणि वर्णभेद विसरून आणि संघटित होऊन धर्माच्या आधारावर कार्य केल्यास देशात हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यास वेळ लागणार नाही. समर्थ रामदासस्वामी यांनी धर्म आणि अध्यात्म यांच्या माध्यमातून तत्कालीन आव्हानांचा सामना केला. समर्थ रामदासस्वामी यांनी लोकांमध्ये हिंदुत्वाप्रती चैतन्य जागृत करण्याचे काम करून त्यांच्यामध्ये क्षात्रवृत्ती जागृत केली. ‘तुम्ही हिंदु आहात’ हे त्यांनी लोकांना सांगितले. त्यानंतर रविदास यांनी हिंदूंना त्यांच्यातील अंतर्गत आव्हानांचा सामना करायला सांगितले. बिपिन चंद्र पाल, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाला लजपत राय हे समाजसुधारक होते. या सर्वांनी हिंदुत्वाला पुढे नेले. बिपिनचंद्र पाल यांनी ‘सोल ऑफ इंडिया’ नावाचे पुस्तक लिहिले आहे. हिंदूंना जागृत करणे हा ते पुस्तक लिहिण्यामागील उद्देश होता. ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, असे त्यांनी सांगितले होते. सध्या गोवा राज्यातील रामनाथ येथे चालू असलेले ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल सर्टिफिकेशन, काशी-मथुरा मुक्ती, धर्मांतर, गोहत्या, मंदिर संस्कृतीचे रक्षण, काश्मिरी हिंदूंचे मायभूमीत पुनर्वसन, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार यांसारख्या विविध विषयांवर मंथन होत आहे. यासमवेतच हिंदु राष्ट्राची वैचारिक दिशा स्पष्ट करणारी ‘हिंदु राष्ट्र संसद’ होईल. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी कृतीआराखडाही सिद्ध केला जाईल. एकंदरीत देशात वैचारिक लढ्याद्वारे काँग्रेससारख्या दुष्ट पक्षांचा वैचारिक पराभव करून हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यानंतरच हिंदूंचे प्रश्न सुटतील, हे त्रिवार सत्य आहे.
काँग्रेससारख्या पक्षांचा वैचारिक पराभव करून हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतरच हिंदूंचे प्रश्न सुटतील, हे त्रिवार सत्य ! |