
कल्याण – महागडा भ्रमणभाष घेतल्याने वडिलांनी त्याविषयी विचारणा केल्यावर रागातून गळफास घेत राजवर्धन यादव (वय १७ वर्षे) या तरुणाने आत्महत्या केली. तो भ्रमणभाष घेण्यासाठी घरातून कुणालाही काही न सांगता पैसे घेऊन उत्तर प्रदेश येथून मुंबईत काकांच्या घरी आला होता. त्याने भ्रमणभाष घेतल्यावर वडील रागावल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. कल्याण पत्रीपूल परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. (महागड्या भ्रमणभाषच्या आहारी जाणारी आणि संयम नष्ट झाल्याने क्षुल्लक कारणावरून टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवणारी आजची तरुणाई ! – संपादक) या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना ५ घंटे वेळ द्यावा लागला.
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !
सातारा निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना काही युवकांकडून मारहाण
Anurag Dhankar Found Dead : त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड हे पोलीस मुख्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले !
अबूसाद शहा याच्यावर कठोर कारवाई करा !
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी