मुसलमान पोलीस हवालदाराकडून लव्ह जिहादद्वारे सहकारी महिलेची फसवणूक !

प्रयागराज – येथील शिवकुटी पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या एका महिला पोलीस हवालदाराने इम्रान खान याच्यावर त्याने लव्ह जिहादद्वारे फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. इम्रान खान हा याच पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे.

इम्रान याने पीडितेला तो विवाहित असून बौद्ध धर्म स्वीकारला असल्याची खोटी माहिती देऊन पीडितेशी विवाह केला. ‘विवाहानंतर माझ्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी इम्रानचे कुटुंबीय दबाव आणत आहेत. माझे सासरे मुल्तान आणि दीर मोहसीन यांनी माझे लैंगिक शोषण केले आहे’, अशी तक्रार या महिला हवालदाराने केली आहे. मोहसीन खान हा क्रिकेटपटू असून तो आय.पी.एल्.मध्ये ‘लखनौ सपुर जायंट्स’ संघाकडून खेळतो. इम्रान खान हा पीडित महिला पोलीस हवालदार जिथे कार्यरत आहे, तेथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहे.

संपादकीय भूमिका 

  • लव्ह जिहाद्यांचा भरणा असलेले पोलीसदल पीडित हिंदु युवतींना न्याय काय देणार ? अशांवर उत्तरप्रदेश सरकारने कठोर कारवाई करावी !
  • ज्यांनी हिंदु युवतींचे लव्ह जिहादपासून रक्षण केले पाहिजे, अशा महिला पोलीसच जर लव्ह जिहादला बळी पडत असतील, तर याहून गंभीर गोष्ट दुसरी कुठली असू शकते ?