दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या ‘ब्रह्मोत्सव विशेषांका’तून पुष्कळ प्रमाणात चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने प्रक्षेपित होणे

सौ. मधुरा धनंजय कर्वे

‘सप्तर्षींच्या आज्ञेने ‘सनातन संस्था’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ यांचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ वा जन्मोत्सवानिमित्त ११.५.२०२३ या दिवशी त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आवृत्तीने ११.५.२०२३ आणि २१.५.२०२३ या दिवशी ‘ब्रह्मोत्सव विशेषांक’ प्रसिद्ध केले. या विशेषांकांची ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या अंकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती पूर्ण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्यातील सकारात्मक ऊर्जा अचूक मोजण्यासाठी ती लोलकाने मोजण्यात आली, तेव्हा ती अनुक्रमे २५४० मीटर आणि २८३२ मीटर एवढी आली. आतापर्यंत विविध प्रसंगी दैनिक ‘सनातन प्रभात’ने प्रसिद्ध केलेल्या विविध विशेषांकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत; त्यापैकी ‘ब्रह्मोत्सव विशेषांकां’ची प्रभावळ सर्वाधिक आली आहे. या अंकातून चैतन्य आणि आनंद यांची स्पंदने पुष्कळ प्रमाणात प्रक्षेपित होत आहेत.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२४.५.२०२३)

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.